विकासकामांसाठी दोन कोटी
By Admin | Updated: March 11, 2016 02:43 IST2016-03-11T02:43:23+5:302016-03-11T02:43:23+5:30
परजिल्ह्यातील १२ आमदार रायगड जिल्ह्यातील विकासकामे करीत आहेत. त्यांना मिळालेल्या निधीपैकी सुमारे २ कोटी ३७ लाख ५१ हजार रुपयांचा निधी खर्च करण्याचे त्यांनी प्रस्तावित केले आहे

विकासकामांसाठी दोन कोटी
आविष्कार देसाई, अलिबाग
परजिल्ह्यातील १२ आमदार रायगड जिल्ह्यातील विकासकामे करीत आहेत. त्यांना मिळालेल्या निधीपैकी सुमारे २ कोटी ३७ लाख ५१ हजार रुपयांचा निधी खर्च करण्याचे त्यांनी प्रस्तावित केले आहे. आतापर्यंत ४३ विकासकामांच्या माध्यमातून सुमारे एक कोटी तीन लाख सात हजार रुपयांचा विकास निधी त्यांनी जिल्ह्यात खर्च केला आहे.
राज्यात विविध राजकीय पक्ष आहेत. त्यामुळे त्यातील काही पक्षांचे आमदार हे निवडून आलेले आहेत. त्यांचे कार्यकर्ते हे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये विखुरलेले आहेत. त्या विभागामध्ये पक्ष वाढला पाहिजे, या उद्देशाने आमदार आपापला निधी त्या-त्या विभागात खर्च करण्याची तयारी करतात. तसेच काही वेळेला एखाद्या आमदाराच्या कोट्यातील निधीचे वाटप होऊन तो संपतो. त्यामुळे त्यांच्या पक्षातील काही कार्यकर्त्यांना विकासकामे करण्याची संधी उपलब्ध होत नाही. त्यांना कामे दिली नाही, तर त्यांची नाराजी ओढावून घेण्याची नामुश्कीही आमदारांवर येते.
कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्यासाठी यावर उपाययोजना म्हणून परजिल्ह्यातील आमदार त्यांचा विकास निधी दुसऱ्या जिल्ह्यात खर्च करतात. त्यामुळे तेथील कार्यकर्त्यांना कामेही मिळतात आणि त्या विभागाचा विकासही साधला जातो.
काही वेळा ठरावीक विभागात आमदारांचा निधी खर्च केला जात नाही. त्यामुळे त्या विशिष्ट पक्षाच्या आमदाराचा निधी त्या विभागात खर्च करुन तेथील विकासाचा अनुशेष भरुन काढण्याचा प्रयत्नही त्या अनुषंगाने केला जातो.
राज्यातील कोणत्याही मतदार संघात आपापला आमदार निधी खर्च करण्याची मुभा आमदारांना आहे. आमदार आपापला विकास निधी राज्यातील कोणत्याही मतदार संघात खर्च करु शकतात. त्यासाठी त्या-त्या जिल्हाधिकारी यांचे निधी उपलब्ध असल्याचे व हस्तांतरणासंबंधीचे पत्र द्यावे लागते. रायगड जिल्ह्यात परराज्यातील आमदारांनी विकासकामे सुचविली आहेत, तसे काही प्रमाणात निधीही देण्यात आला आहे.
-सुनील जाधव, जिल्हा नियोजन अधिकारी
>>>>>>>>>>
आमदार प्र्रस्तावित प्रस्तावित मंजूर कामेरक्कम
रक्कमकामे
निरंजन डावखरे ८७.६४१७ ४ २३.३०
अनंत गाडगीळ२०.०० २२२०.००
प्रकाश बिनसाळे २१.९० ५३१२.०९
सुभाष देसाई२०.००२२२०.००
नरेंद्र पाटील २४.९९३ २ १०.००
राहुल नार्वेकर१०.००१११०.००
महादेव जानकर५.००११ ५.००
रामनाथ मोते २०.४८ ५ १ २.५०
धनंजय मुंडे १०.००२ ० ००
जोगेंद्र कवाडे९.००३ ० ००
किरण पावसकर ५१ ०००
विजय सावंत३.५०१०००