खारघरमध्ये दोन कोरोना रुग्ण; आरोग्य विभाग झाले सतर्क
By वैभव गायकर | Updated: December 23, 2023 14:11 IST2023-12-23T14:11:27+5:302023-12-23T14:11:31+5:30
दोन्ही रुग्णांचे अहवाल तपासण्यासाठी प्रयोग शाळेकडे पाठविण्यात आले असून दोन दिवसात त्याचे अहवाल पालिकेला प्राप्त होणार

खारघरमध्ये दोन कोरोना रुग्ण; आरोग्य विभाग झाले सतर्क
पनवेल:पनवेल महानगरपालिका क्षेत्रात खारघर शहरात दोन कोरोना रुग्ण आढळल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे.नुकत्याच कोरोनाच्या नव्या व्हेरिएंट्सची चर्चा रंगत असताना खारघर शहरातील करोनाच्या दोन रुग्णामुळे आरोग्य विभाग सतर्क झाले आहे.
खारघर सेक्टर 15 आणि 16 याठिकाणी हे दोन रुग्ण सापडले असून दोन्ही रुग्ण सुरक्षित असुन घरातच विलगीकरणात आहेत.महिला आणि पुरुष रुग्णांपैकी महिलेने नजीकच्या काळात प्रवास केला असल्याची माहिती पालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ आनंद गोसावी यांनी दिली.
दरम्यान दोन्ही रुग्णांचे अहवाल तपासण्यासाठी प्रयोग शाळेकडे पाठविण्यात आले असून दोन दिवसात त्याचे अहवाल पालिकेला प्राप्त झाल्यावर कोरोनाच्या नवीन व्हेरिएंट बाबत अधिक माहिती मिळू शकेल अशी माहिती डॉ गोसावी यांनी दिली.दरम्यान पालिकेका प्रशासन सतर्क झाले असुन आयुक्त गणेश देशमुख यांनी आरोग्य विभागाला कोरोना रुग्णाबाबत शासनाच्या प्राप्त झालेल्या गाईडलाईन नुसार रुग्णांची माहिती गोळा करण्याच्या सुचना दिल्या आहेत.