शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

रबाळे एमआयडीसीत दोन कंपन्यांना आग

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2021 09:09 IST

मंगळवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास बाळे एमआयडीसीमधील ए.एस.व्ही. मल्टीकेमिकल्स या कंपनीत आग लागली. आगीमध्ये कंपनीतील केमिकलने पेट घेतल्याने छोटे स्फोट होऊ लागले.

नवी मुंबई : रबाळे एमआयडीसीमधील ए.एस.व्ही. केमिकल्स या कंपनीला आग लागल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. आग अधिक पसरल्याने शेजारच्या एका कंपनीने पेट घेतला होता. त्यामुळे आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाला सुमारे तीन तास प्रयत्न करावे लागले. मंगळवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास बाळे एमआयडीसीमधील ए.एस.व्ही. मल्टीकेमिकल्स या कंपनीत आग लागली. आगीमध्ये कंपनीतील केमिकलने पेट घेतल्याने छोटे स्फोट होऊ लागले. त्यामुळे काही मिनिटांतच संपूर्ण कंपनीत आग पसरली. मोठ्या प्रमाणात धुराचे लोट निघत होते, तर सतत होणाऱ्या छोट्या छोट्या स्फोटाने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. या आगीची माहिती मिळताच रबाळे एमआयडीसी अग्निशमन दलाच्या जवानांनी  धाव घेतली. त्यांच्याकडून आग विझविण्याचे प्रयत्न सुरू असतानाच छोटे मोठे स्फोट होत होते. आगीचा भडका होऊन शेजारच्या शेखर ऑप्टो इलेक्ट्राॅनिक्स या कंपनीने पेट घेतला होता. त्यामुळे महापालिका अग्निशमन दलाचे व इतर एकूण सहा बंब घटनास्थळी दाखल झाले होते. ही आग वेळीच आटोक्यात न आल्यास परिसरातील इतरही कंपन्यांना धोका होता. त्यामुळे सलग तीन तास प्रयत्न करून अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळविले. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे एमआयडीसी अग्निशमन दलाचे अधिकारी आर. बी. पाटील यांनी सांगितले; परंतु आगीमध्ये दोन्ही कंपन्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण अद्याप समोर आले नाही. खबरदारी म्हणून परिसरातल्या इतरही कंपन्यांमधील कामगारांना बाहेर काढण्यात आले होते.  

टॅग्स :fireआगFire Brigadeअग्निशमन दलNavi Mumbaiनवी मुंबई