शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

दोन कंपन्या आगीच्या भक्षस्थानी; रबाळे एमआयडीसीमधील घटना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2021 20:06 IST

Fire to two Companies : आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाला सुमारे तीन तास प्रयत्न करावे लागले. 

ठळक मुद्देमंगळवारी संध्याकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली.

नवी मुंबई : रबाळे एमआयडीसी मधील ए.एस.व्ही केमिकल्स या कंपनीला आग लागल्याची घटना मंगळवारी संध्याकाळी घडली. आग अधिक पसरल्याने शेजारच्या देखील एका कंपनीने पेट घेतला होता. त्यामुळे आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाला सुमारे तीन तास प्रयत्न करावे लागले. 

 

मंगळवारी संध्याकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली. रबाळे एमआयडीसी मधील ए.एस.व्ही. मल्टीकेमिकल्स या कंपनीत आग लागली. आगीमध्ये कंपनीतील केमिकल ने पेट घेतल्याने छोटे स्फोट होऊ लागले. त्यामुळे काही मिनिटातच संपूर्ण कंपनीत आग पसरली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात धुराचे लोट निघत होते. तर सतत होणाऱ्या छोट्या छोट्या स्फोटाने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या आगीची माहिती मिळताच रबाळे एमआयडीसी अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्याकडून आग वीजवण्याचे प्रयत्न सुरु असतानाच छोटे मोठे स्फोट होत होते. शिवाय आगीचा भडका होऊन शेजारच्या शेखर ऑप्टो इलेकट्रोनिक्स या कंपनीने देखील पेट घेतला होता. त्यामुळे महापालिका अग्निशमन दलाचे व इतर एकूण सहा बंब घटनास्थळी दाखल झाले होते. हि आग वेळीच आटोक्यात न आल्यास परिसरातील इतरही कंपन्यांना धोका होता. त्यामुळे सलग तीन तास शर्थीचे प्रयत्न करून अग्निशमन दलाने सुमारे तीन तासांनी आगीवर नियंत्रण मिळवले. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे एमआयडीसी अग्निशमन दलाचे अधिकारी आर. बी. पाटील यांनी सांगितले. परंतु आगीमध्ये दोन्ही कंपन्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण अद्याप समोर आले नाही. तर खबरदारी म्हणून परिसरातल्या इतरही कंपन्यांमधील कामगारांना बाहेर काढण्यात आले होते. 

टॅग्स :fireआगFire Brigadeअग्निशमन दलMIDCएमआयडीसीNavi Mumbaiनवी मुंबई