समाजकंटकांनी जाळल्या दोन रिक्षा
By Admin | Updated: December 19, 2015 02:46 IST2015-12-19T02:46:25+5:302015-12-19T02:46:25+5:30
नेरूळ सेक्टर ६ मध्ये बुधवारी रात्री समाजकंटकांनी दोन रिक्षा जाळल्या. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

समाजकंटकांनी जाळल्या दोन रिक्षा
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर ६ मध्ये बुधवारी रात्री समाजकंटकांनी दोन रिक्षा जाळल्या. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
येथील पंचरत्न सोसायटीच्या आवारामध्ये एमएच ४३ एसी ५३ व एमएच ४३ एसी ७८०२ या दोन रिक्षा उभ्या केल्या होत्या. रात्री १ वाजण्याच्या सुमारास समाजकंटकांनी रिक्षांना आग लावली. याच इमारतीमध्ये राहणाऱ्या शिववाहतूक सेनेचे बेलापूर विधानसभा अध्यक्ष दिलीप आमले यांनी व नागरिकांनी घटनास्थळी धाव घेवून आग विझविण्यास सुरुवात केली. दोन्ही रिक्षा आगीत खाक झाल्या आहेत. आग लागलेल्या ठिकाणापासून विजेचे मीटर जवळच होते. त्यांना आग लागली असती तर मोठी दुर्घटना घडली असती. आमले यांनी दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली.
कर्ज काढून दोन महिन्यांपूर्वी विकत घेतलेली रिक्षा जळाल्यामुळे रिक्षा चालक सुनील नलावडे हतबल झाले आहेत. गाडी जळाली आता कर्ज कसे फेडायचे, असा प्रश्न त्यांना पडला आहे