प्रवाशांना लुटणाऱ्या दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2016 02:57 IST2016-03-27T02:57:42+5:302016-03-27T02:57:42+5:30

वाघापूर रस्त्यावर उदाचीवाडी (ता. पुरंदर) येथे वाहनचालकांना अडवून लूटमार करणाऱ्या आठ जणांविरोधात सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांना अटक

Two arrested for looting passengers | प्रवाशांना लुटणाऱ्या दोघांना अटक

प्रवाशांना लुटणाऱ्या दोघांना अटक

सासवड : वाघापूर रस्त्यावर उदाचीवाडी (ता. पुरंदर) येथे वाहनचालकांना अडवून लूटमार करणाऱ्या आठ जणांविरोधात सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांना अटक करण्यात आली आहे. हे आठही आरोपी वनपुरी गावचे आहेत. दोघांना न्यायालयाने २८ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सहा आरोपी अद्याप फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
यासंदर्भात आत्माराम मोहन खेडेकर (वय २६, रा. खामगाव, दौंड) यांनी फिर्याद दिली आहे. अमोल सीताराम कुंभारकर (वय २६), नामदेव बबन कुंभारकर (वय २८) यांना अटक केली आहे. चेतन सीताराम कुंभारकर, गणेश बबन कुंभारकर, प्रशांत ऊर्फ टायगर रघुनाथ कुंभारकर यांच्यासह इतर तीन अज्ञात, असे मिळून सहा जण (सर्व रा. वनपुरी ) घटनेनंतर फरार झाले आहेत. पोलिसांनी या गुन्ह्यात वापरण्यात आलेली काठी-बांबू यांच्यासह लुटलेला मोबाईल आणि रोख १० हजार, असा एकूण १५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
आत्माराम खेडेकर हे क्लिनरसह टेम्पो (एमएच १२ डीटी ८५३) घेऊन जात असताना त्यांनी दोघांना गाडी अडवून मारहान केली. एका ७० वर्षीय वृद्ध नागरिकास मारहाण करून गाडीतून फेकून दिले होते.

Web Title: Two arrested for looting passengers