शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

चंदिगडमधून आंतरराज्यीय टोळीतील दोघांना अटक, अल्पवयीन मुलाचा समावेश  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 06:35 IST

एनआरआय पोलिसांनी चंदिगड येथून आंतरराज्यीय टोळीच्या दोघांना अटक केली आहे. त्यामध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश असून त्याच्याकडून सात गुन्ह्यांची उकल झाली आहे. कारने नवी मुंबईत येवून ही टोळी घरफोडी करून पळून जायची. त्यांच्याकडून ४ लाख १० हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

नवी मुंबई : एनआरआय पोलिसांनी चंदिगड येथून आंतरराज्यीय टोळीच्या दोघांना अटक केली आहे. त्यामध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश असून त्याच्याकडून सात गुन्ह्यांची उकल झाली आहे. कारने नवी मुंबईत येवून ही टोळी घरफोडी करून पळून जायची. त्यांच्याकडून ४ लाख १० हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.उलवे परिसरात घरफोडी करणाºया गुन्हेगारांमध्ये चंदिगढ येथील टोळीचा समावेश असल्याची माहिती एनआरआय पोलिसांना मिळाली होती. यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता जाधव यांनी विशेष पथकामार्फत तपासाला सुरवात केली होती. यादरम्यान भाडोत्री घरामध्ये राहणाºया काही व्यक्तींबाबत संशयास्पद माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील, सहायक निरीक्षक अशोक फल्ले, उपनिरीक्षक भूषण कापडणीस, हवालदार जगदीश पाटील, विष्णू नरवाडे, दीपक सावंत, सचिन बोठे आदींचे पथक तयार करण्यात आले होते. त्यांच्याकडून संशयित गुन्हेगाराचा शोध सुरू असताना दोघे जण हाती लागले. त्यामध्ये एक जण अल्पवयीन असून सुमित सिंग (३२) असे दुसºयाचे नाव आहे. दोघेही चंदिगडचे राहणारे असून साथीदारांसह नवी मुंबईत उलवे परिसरात यायचे. त्याठिकाणी काही दिवसांसाठी भाडोत्री घर घेवून रात्रीच्या वेळी परिसरात घरफोडी करायचे. अशाप्रकारे त्यांनी केलेल्या सात गुन्ह्यांची कबुली पोलिसांना दिली आहे. या गुन्ह्यातील चार लाख १० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल भाड्याने घेतलेल्या घरातून तसेच चंदिगड येथील राहत्या घरातून जप्त केला आहे.या टोळीने राज्यात इतरही अनेक ठिकाणी गुन्हे केल्याची शक्यता आहे. यानुसार एनआरआय पोलीस अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :Crimeगुन्हाPoliceपोलिस