मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर दोन अपघात

By Admin | Updated: September 1, 2016 03:21 IST2016-09-01T03:21:43+5:302016-09-01T03:21:43+5:30

महाड तालुक्यातील दासगाव आणि वहूर या दोन गावांच्या ठिकाणी दोन वेगवेगळे ट्रकचे अपघात झाले.

Two accidents on the Mumbai-Goa National Highway | मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर दोन अपघात

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर दोन अपघात

दासगाव/ महाड : महाड तालुक्यातील दासगाव आणि वहूर या दोन गावांच्या ठिकाणी दोन वेगवेगळे ट्रकचे अपघात झाले. या अपघातात वहूरमधील दोन्ही गाड्यांचे चालक जखमी झाले. ट्रकला काढण्याचा प्रक्रियेमध्ये जवळपास एक तास महामार्ग बंद पडला होता.
बुधवारी सकाळी दासगावचे हद्दीत साबण भरून मुंबईच्या दिशेला जाणारा ट्रक क्र. एमएच १० झेड १७३७ अचानक पलटी झाला. मात्र यामध्ये कोणीही जखमी झाले नाही. तसेच सकाळी ८.१५ वाजण्याच्या सुमारास वहूर गावाजवळील उगवतीवाडीमध्ये गोव्याकडे जाणारा अ‍ॅसिडचा टँकर क्र. एमएच ४३ वाय ३८६ व महाड ते टोक रेती बंदरामध्ये जाणारा वाळू ट्रक क्र. एमएच ०८ एच १३३४ यांची समोरासमोर धडक झाली. या अपघातामध्ये दोन्ही ट्रकचालक विकास चव्हाण (४४, रा. लोणेरे) व रणजीत नाईक (३८,रा. उल्हासनगर ) हे जखमी झाले. त्यांना दासगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणण्यात आले.

वाहतूक कोंडी : दासगाव हद्दीत अपघात झालेल्या ट्रकला सकाळी अचानक बाहेर रस्त्यावर काढण्याचे काम सुरू केल्याने राष्ट्रीय महामार्ग एक तास बंद पडला. या दरम्यान सकाळी शाळेमध्ये जाणाऱ्या मुलांच्या बस अडकून पडल्याने शाळेत जाण्यास जवळपास मुलांना एक तास उशीर झाला. गाडी मालकांनी बिनधास्तपणे महामार्गाचा विचार न करता गाडी काढण्याचे काम सुरूच ठेवले. एका तासानंतर अनेक नागरिकांचे फोन गेल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग पोलीस शाखा महाड हे या ठिकाणी पोहोचून वाहतूक सुरळीत केली.

पोलादपूर : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी (३० आॅगस्ट) रात्री ८.१५ वाजता पोलादपूर तालुक्यातील पार्ले गावच्या हद्दीत टँकर उलटल्याने अपघात झाला.
चालक राजेशकुमार सुरेंद्र पांडे (रा.निविया-बिहार) मालवाहू टँकरमध्ये इथिलीन ड्राय फ्लोराईड नामक रसायन घेऊन मुंबईकडून रत्नागिरीकडे जात असताना पार्ले गावानजीक त्यांचा वाहनावरील ताबा सुटला व रस्त्यालगत असलेल्या झाडाला धडकून गाडी उलटली. या अपघातात राजेशकुमार पांडे किरकोळ जखमी झाले. त्यांनीच पोलादपूर पोलीस ठाण्यात अपघाताची माहिती दिली. पोलिसांनी गाडीतील रसायन गळती होत असल्याने महामार्गावरील वाहतूक काही वेळाकरिता बंद करण्यात आली होती.

Web Title: Two accidents on the Mumbai-Goa National Highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.