म्हसळ्यात बारा घरफोड्या

By Admin | Updated: March 9, 2016 03:41 IST2016-03-09T03:41:24+5:302016-03-09T03:41:24+5:30

तालुक्यात सध्या चोरांनी धुमाकूळ घातला आहे. तालुक्यातील मौजे खरसई येथे ११ बंद घरांत घरफोडी करण्यात आली. शिवसेना खरसई शाखेत सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरीचा प्रयत्न झाला.

Twelve house burglars in the middle | म्हसळ्यात बारा घरफोड्या

म्हसळ्यात बारा घरफोड्या

म्हसळा : तालुक्यात सध्या चोरांनी धुमाकूळ घातला आहे. तालुक्यातील मौजे खरसई येथे ११ बंद घरांत घरफोडी करण्यात आली. शिवसेना खरसई शाखेत सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरीचा प्रयत्न झाला. घरफोडी झाली ते सर्व जण मुंबई व अन्यत्र राहत असल्याने नक्की किती रक्कम व दागिने चोरीला गेले, हे समजू शकले नसले तरी लाखोंचा ऐवज चोरीला गेल्याची शक्यता आहे. अशा प्रकारच्या घरफोडीच्या घटनांमुळे नागरिकांनमध्ये भीतीचे वातावरण आहे. म्हसळा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेल्या वर्षापासून म्हसळा तालुक्यात घरफोडीच्या घटना वाढत असून, चोरांनी म्हसळा पोलिसांना आव्हान दिले आहे. तालुक्यातील खरसाई येथे घरे बंद असल्याचा फायदा घेऊन अज्ञात चोरांनी घराचा कडीकोयंडा तोडून घरफोडी केली. ही घटना सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. ११ घरफोड्या व शिवसेना खरसई शाखेत चोरी झाली
आहे.
यामध्ये महादेव नाक्ती यांचे १,८०० रुपये रोख व अडीच - तीन लाखांचे दागिने चोरीला गेले. तर कानू पयेर यांचे रोख ८,५०० रुपये, मनोहर पयेर अंदाजे १०,००० रुपयांचे सोने, महादेव म्हात्रे ५०,००० रुपयांचे दागिने, गंगाबाई नाक्ती (माहीत नाही), शिवसेना शाखेत काही नाही, नारायण धुमाळ सोन्याच्या दोन नाथी, अनंत कांबळे काही नाही, अनिल देवाजी खोत यांची समई, हंडा व कलश, जनार्दन कांबळे, गणपत खोत, पांडुरंग लेपकर यांचा किती ऐवज चोरीला गेला, हे समजू शकले नाही.
महादेव नाक्ती यांनी फिर्याद दिल्यानंतर म्हसळा पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (वार्ताहर)

Web Title: Twelve house burglars in the middle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.