'नमो चषक २०२४' क्रिकेट स्पर्धेत तुर्भे संघाची बाजी

By योगेश पिंगळे | Published: February 5, 2024 05:14 PM2024-02-05T17:14:31+5:302024-02-05T17:15:34+5:30

आराध्या ११ शहाबाज दुसऱ्या क्रमांकावर.

turbhe team won the namo cup 2024 in cricket tournament in navi mumbai | 'नमो चषक २०२४' क्रिकेट स्पर्धेत तुर्भे संघाची बाजी

'नमो चषक २०२४' क्रिकेट स्पर्धेत तुर्भे संघाची बाजी

योगेश पिंगळे,नवी मुंबई : भारतीय जनता युवा मोर्चा बेलापूर मतदारसंघात आमदार मंदा म्हात्रे यांच्या माध्यमातून नमो चषक २०२४ व भव्य क्रीडा सांस्कृतिक महोत्सवातील क्रिकेट सामान्यांचे आयोजन करण्यात आले होते. करावे येथील कै. गणपतशेठ तांडेल मैदानामध्ये पार पडलेल्या क्रिकेट स्पर्धेची सांगता जल्लोषात झाली. या स्पर्धेमध्ये जय गजानन तुर्भे संघाने बाजी मारली असून, त्यांना १ लाख ५० हजार रुपये व आकर्षक चषक, तर द्वितीय क्रमांक आराध्या ११ शहाबाज यांनी पाठविला. त्यांना एक लाख रुपये व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या संपूर्ण देशभरात “नमो चषक-२०२४ सुरू असून, बेलापूर मतदारसंघातील संपूर्ण विभागामध्ये नमो चषक स्पर्धा पार पडल्याचे आमदार म्हात्रे यांनी सांगितले. मागील महिनाभर ज्येष्ठांकरिता, महिला व तरुण-तरुणींसाठी फुटबॉल, कॅरम, बुद्धिबळ, कबड्डी, १०० मीटर, ४०० मीटर धावणे, नृत्य, गायन, वेशभूषा, चित्रकला अशा विविध स्पर्धा पार पडल्या या सर्व स्पर्धांमध्ये लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, हजारो स्पर्धकांनी नमो ॲपवर नावनोंदणी करून सहभाग नोंदविल्याचे आमदार मंदा म्हात्रे यांनी सांगितले.

स्पर्धेतील प्रत्येकाचा गौरव :

स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेल्या संघातील प्रत्येक स्पर्धकाला प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी आमदार मंदा म्हात्रे यांच्या समवेत माजी नगरसेवक काशीनाथ पाटील, सुनील पाटील, नीलेश म्हात्रे, समाजसेवक दिलीप पाटील, कुंदन म्हात्रे, विकास सोरटे, पुण्यनाथ तांडेल, जयवंत तांडेल, गुरुनाथ तांडेल, संजय ओबेरॉय, प्रताप भोसकर, सचिन नाईक आदी पदाधिकारी, कार्यकर्ते, खेळाडू आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: turbhe team won the namo cup 2024 in cricket tournament in navi mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.