तुर्भे येथून मुलाला पळवले
By Admin | Updated: July 13, 2015 23:34 IST2015-07-13T23:34:04+5:302015-07-13T23:34:04+5:30
ओळखीचा गैरफायदा घेत चार वर्षीय मुलाला पळवल्याचा प्रकार तुर्भे स्टोअर येथे घडला. एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तुर्भे येथून मुलाला पळवले
नवी मुंबई : ओळखीचा गैरफायदा घेत चार वर्षीय मुलाला पळवल्याचा प्रकार तुर्भे स्टोअर येथे घडला. एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बबलू खान यांच्यासोबत शनिवारी रात्री हा प्रकार घडला. ते मोबाइलमध्ये रिचार्ज करण्यासाठी अरमान याला सोबत घेऊन घराबाहेर गेले होते. त्यांच्या ओळखीचा मोहम्मद खान (२७) त्यांना भेटला. त्याच्या सोबत अरमान खेळत असल्याने बबलूदेखील त्याला मोहम्मदच्या ताब्यात देऊन दुकानात गेले. परंतु काहीच वेळात दुकानातून बाहेर आल्यानंतर अरमान व मोहम्मद दोघेही बेपत्ता असल्याचे त्यांना समजले. अरमानला पळवून नेल्याची तक्रार त्यांनी केली आहे. मोहम्मद हा मूळचा उत्तर प्रदेशचा राहणारा असून एपीएमसी येथे काम करायचा.