महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

By Admin | Updated: September 18, 2014 01:11 IST2014-09-18T01:11:34+5:302014-09-18T01:11:34+5:30

सुरेखा तांडेल (5क्) या महिलेवर अनिता म्हात्रे (45) या महिलेने रॉकेल टाकून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना पनवेलमध्ये घडली.

Trying to burn the woman alive | महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

पनवेल : उसने दिलेले दोन लाख रुपये मागण्यासाठी गेलेल्या सुरेखा तांडेल (5क्) या महिलेवर अनिता म्हात्रे (45) या महिलेने रॉकेल टाकून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना पनवेलमध्ये घडली. या घटनेत सुरेखा तांडेल गंभीररीत्या भाजली असून तिला सायन येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर पनवेल शहर पोलिसांनी आरोपी अनिता म्हात्रे हिच्यावर कलम 3क्7 नुसार गुन्हा दाखल करून तिला अटक केली. न्यायालयाने अनिता म्हात्रे हिची पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. 
या घटनेत गंभीररीत्या भाजलेली सुरेखा ही पनवेलमधील लाइन आळी या भागात राहते. तर तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करणारी अनिता म्हात्रे ही पनवेलमधील लिखिते हॉस्पिटलच्या इमारतीत राहते. या दोघी एकमेकींच्या परिचयाच्या असून 1क् वर्षापूर्वी सुरेखा तांडेल हिने उसनवारीने अनिता म्हात्रे हिला 2 लाख रुपये दिले होते. 1क् वर्षानंतर सुद्धा अनिताने उसनवारीने घेतलेले 2 लाख रुपये परत न केल्याने दोघींमध्ये पैशावरून अनेक वेळा भांडणो झाली होती. सुरेखा पैसे मागण्यासाठी अनिताच्या घरी गेली असता याच कारणावरून त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. या वेळी अनिता म्हात्रे हिने सुरेखाला उसने पैसे देणार नसल्याचे सांगताच तिला जाळून टाकण्याची धमकी दिली. यावरून त्यांच्यातील भांडण आणखी विकोपाला गेले. या भांडणाच्या रागातच अनिताने घरातील रॉकेलने भरलेली बाटली सुरेखाच्या अंगावर ओतली. त्यानंतर तिला पेटवून दिले. या वेळी सुरेखाच्या अंगावरील कपडय़ाने पेट घेतल्यानंतर आजूबाजूच्या रहिवाशांनी तिला वाचवले. मात्र तोर्पयत सुरेखाचे तोंड, हात, छातीचा संपूर्ण भाग गंभीररीत्या भाजला होता. त्यानंतर तिला सायन येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. (वार्ताहर)

 

Web Title: Trying to burn the woman alive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.