माणगावजवळ मिनीडोरला ट्रकची धडक; एक ठार

By Admin | Updated: February 6, 2016 02:22 IST2016-02-06T02:22:37+5:302016-02-06T02:22:37+5:30

मुंबई-गोवा महामार्गावर भरधाव ट्रकची समोरून येणाऱ्या मिनीडोर रिक्षाला ठोकर लागून झालेल्या भीषण अपघातात मिनीडोर चालक जागीच ठार झाला तर त्याची

Truck collide near Mangaon; One killed | माणगावजवळ मिनीडोरला ट्रकची धडक; एक ठार

माणगावजवळ मिनीडोरला ट्रकची धडक; एक ठार

महाड : मुंबई-गोवा महामार्गावर भरधाव ट्रकची समोरून येणाऱ्या मिनीडोर रिक्षाला ठोकर लागून झालेल्या भीषण अपघातात मिनीडोर चालक जागीच ठार झाला तर त्याची पत्नी गंभीररीत्या जखमी झाली. हा अपघात मंगळवारी मध्यरात्री १२.३० वा. च्या सुमारास माणगावनजीकच्या मुगवली फाटा येथे घडला. या अपघातात मिनीडोर रिक्षाचे नुकसान झाले.
रियाज अब्दल्ला पटेल (४२, रा. पानसरे मोहल्ला महाड) हा मिनीडोर चालक या अपघातात ठार झाला तर त्याची पत्नी शबनम रियाज पटेल (३५) ही गंभीर जखमी झाली असून तिला पुढील उपचारासाठी पनवेल येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. खेड येथून मालवाहतूक ट्रक एमएच ०८ डब्लू ७११६ मुंबईकडे जात असताना महाडकडे येणाऱ्या मिनीडोर रिक्षा एमएच ०६ एस ६११३ वर हा भरधाव ट्रकवर आदळला. माणगांव पोलीस ठाण्यात या अपघात प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून ट्रकचालकाला अटक करण्यात आली आहे. अपघाताची माहिती समजताच पोलीस निरीक्षक आर. एस. डोंगरे यांनी अपघातस्थळी धाव घेतली. रियाज पटेल यांच्या अपघाती निधनाबद्दल मिनीडोर संघटना तसेच पानसरे मोहल्ला परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (वार्ताहर)

Web Title: Truck collide near Mangaon; One killed