शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
4
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
5
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
6
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
7
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
8
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
9
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
10
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
11
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
12
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
13
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
14
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
15
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
16
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
17
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
18
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता
19
IPL 2024 Playoffs Qualifier 1 KKR vs SRH: क्वालिफायर सामन्याआधी उडाली खळबळ, स्टेडियमच्या आत-बाहेर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, प्रकरण काय?
20
हेमंत सोरेन अन् अरविंद केजरीवाल यांची प्रकरणे वेगवेगळी; ईडीचा सुप्रीम कोर्टात जामिनाला विरोध

मॅफ्को परिसराला समस्यांचा विळखा; व्यावसायिकांनी केले अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2019 11:20 PM

रोडवर कचऱ्याचे ढिगारे; मलनि:सारण केंद्राची संरक्षण भिंतही तुटली

नामदेव मोरे नवी मुंबई : शीतगृह व दूध डेअरी व्यवसायासाठी आरक्षित असलेल्या मॅफ्को परिसराला समस्यांचा विळखा पडला आहे. काही शीतगृहचालकांनी अनधिकृतपणे शेड उभारून त्याचा व्यावसायिक वापर सुरू केला आहे. पदपथावर कँटीन सुरू करण्यात आले आहे. मलनि:सारण केंद्राची संरक्षण भिंत कोसळली असून आतमधील शेडचा धर्मशाळेप्रमाणे वापर सुरू झाला आहे.

नवी मुंबईमधील औद्योगिक विभागामध्ये एमआयडीसीबरोबर एपीएमसी परिसराचाही समावेश आहे. बाजार समितीच्या बाजूला तुर्भे रेल्वे स्टेशन समोर वखार महामंडळाचे गोडाऊन, रेल्वे यार्ड, हॉटेल व्यवसायासाठी भूखंड राखीव आहेत. कांदा मार्केटच्या बाजूला मॅफ्को मार्केटच्या मागील बाजूला दूध व्यवसाय व शीतगृहांसाठी भूखंड राखीव आहेत. सद्यस्थितीमध्ये या परिसरामध्ये नाफेड, बाजार समिती, यू. पी. कोल्डस्टोरेजसह अनेक शीतगृह प्रकल्प सुरू आहेत. वारणा, मदर डेअरीसह अनेक दूध प्रकल्पांचे मुंबईमधील प्रकल्प या परिसरामध्ये आहेत. शीतगृह व दूध प्रकल्पांमुळे या परिसराला विशेष महत्त्व आहे. या व्यवसायासाठी प्रकल्पाच्या परिसरामध्ये स्वच्छता असणे आवश्यक आहे; परंतु याकडे महानगरपालिका प्रशासन दुर्लक्ष करू लागले आहे. कांदा मार्केटच्या मागील बाजूला कचºयाचे मोठे ढीग साचले आहेत. या कचºयाच्या खाली डेब्रिज टाकून ठेवले असल्याची शक्यता आहे. २० ते ३० डम्पर भरतील एवढा कचरा व डेब्रिज साचले आहे. अनेक महिन्यांपासून हा कचरा येथे असूनही अद्याप प्रशासनाने तो हटविलेला नाही. कांदा मार्केटच्याच मागील बाजूला दोन महिन्यांपासून मलनि:सारण वाहिनी फुटली आहे. मलमिश्रीत पाणी रोडवर येऊन मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरू लागली आहे. देशाच्या कानाकोपºयातून आलेले वाहतूकदार येथे त्यांचे ट्रक उभे करत असतात. दुर्गंधीमुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

महापालिकेच्या प्रमुख मलनि:सारण केंद्रांमध्ये कांदा मार्केटला लागून असलेल्या केंद्राचा समावेश आहे. केंद्राची एपीएमसीच्या शीतगृहापासून ते दूध डेअरी प्रकल्पांपर्यंतची संरक्षण भिंत कोसळली आहे. संरक्षण भिंतीच्या आतमध्ये पत्र्याचे शेड उभारण्यात आले आहेत. शेडचा धर्मशाळेप्रमाणेवापर केला जात आहे. मद्यपी व इतर नागरिक या ठिकाणी बसलेले असतात. मलनि:सारण केंद्राच्या एक कोपºयाचा कचराकुंडीप्रमाणे वापर केला जात असून, त्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरू लागली आहे. या परिसरातील प्रभू हिरा व इतर काही शीतगृहचालकांनी अनधिकृतपणे शेड बांधले असून शेडचा व्यावसायिक वापर केला जात आहे. या अतिक्रमणाकडेही प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे निदर्शनास आले आहे. वारणा चौक ते चिराग कोल्ड स्टोरेजपर्यंत पदपथावर चार ठिकाणी कँटीन चालविले जात आहे.पूर्णपणे पदपथ अडविण्यात आला असून त्यामुळे पादचाऱ्यांना ये-जा करण्यास अडथळा निर्माण होऊ लागला आहे. हे अतिक्रमण हटविण्याचीही मागणी केली जात आहे.मॅफ्को परिसरामध्ये कोणी पदपथावर व इतर ठिकाणी अतिक्रमण केले असल्यास त्यावर तत्काळ कारवाई केली जाईल. इतर समस्यांचीही माहिती घेऊन उचित कार्यवाही केली जाईल. - समीर जाधव, विभाग अधिकारी, तुर्भे