स्वप्निलला श्रद्धांजली
By Admin | Updated: July 25, 2016 03:15 IST2016-07-25T03:15:14+5:302016-07-25T03:15:14+5:30
आंतरजातीय प्रेमप्रकरणातून हत्या झालेल्या स्वप्निल सोनवणे याची रविवारी शोकसभा झाली. यावेळी ६०० हून अधिक नागरिकांनी उपस्थित राहून स्वप्निलला श्रद्धांजली वाहिली

स्वप्निलला श्रद्धांजली
नवी मुंबई : आंतरजातीय प्रेमप्रकरणातून हत्या झालेल्या स्वप्निल सोनवणे याची रविवारी शोकसभा झाली. यावेळी ६०० हून अधिक नागरिकांनी उपस्थित राहून स्वप्निलला श्रद्धांजली वाहिली. आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांसह सर्वपक्षीय देखील यावेळी उपस्थित होते.
नेरूळ येथे राहणाऱ्या स्वप्निल सोनवणे (१५) याची मंगळवारी रात्री आंतरजातीय प्रेमप्रकरणातून हत्या झाली आहे. या हत्येप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत १२ जणांना अटक केली आहे. त्यामध्ये दोघा अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. याप्रकरणी दोघा पोलिसांचेही निलंबन करण्यात आलेले आहे. स्वप्निलच्या हत्येबाबत सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून, घडलेल्या घटनेचाही निषेध नोंदवला जात आहे. रविवारी स्वप्निलच्या राहत्या परिसरात नेरूळमधील सीबीआय कॉलनीत श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आंबेडकरी चळवळीतील प्रमुख्य व्यक्तींसह नगरसेविका नेत्रा शिर्के, नगरसेवक संजू वाडे, आरपीआयचे महेश खरे, जिल्हा अध्यक्ष सिद्राम ओहोळ, यशपाल ओहोळ, एल. आर. गायकवाड, अंकुश सोनवणे आदी सर्वपक्षीय पदाधिकारी तसेच सुमारे ६०० हून अधिक नागरिक उपस्थित होते. त्यांनी स्वप्निलच्या प्रतिमेला श्रद्धांजली वाहत त्याच्या आठवणींना उजाळा दिला. ज्या इमारतीमध्ये स्वप्निल सहकुटुंब राहत होता, त्या इमारतीमधील अनेक कुटुंबीयांशी त्याचे जिव्हाळ्याचे संबंध होते. यामुळे स्वप्निलच्या हत्येने सोनवणे कुटुंबीयांसह इतर अनेक कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळलेला आहे. घटनेच्या निषेधार्थ शांती रॅलीचे देखील आयोजन केले होते. परंतु सुरक्षेच्या कारणास्तव आपसी समझोता करीत रॅलीऐवजी श्रद्धांजली सभा घेण्यात आली.