अपघाताच्या ठिकाणी प्रवाशांचा माशांवर ताव

By Admin | Updated: July 6, 2017 06:47 IST2017-07-06T06:47:14+5:302017-07-06T06:47:14+5:30

भीषण अपघाताच्या ठिकाणी घटनेचे गांभीर्य विसरून प्रवाशांनी ट्रकमधून पडलेल्या माशांवर ताव मारल्याचे चित्र मंगळवारी सकाळी

TRAVEL OF PRACTICAL FISH | अपघाताच्या ठिकाणी प्रवाशांचा माशांवर ताव

अपघाताच्या ठिकाणी प्रवाशांचा माशांवर ताव

नवी मुंबई : भीषण अपघाताच्या ठिकाणी घटनेचे गांभीर्य विसरून प्रवाशांनी ट्रकमधून पडलेल्या माशांवर ताव मारल्याचे चित्र मंगळवारी सकाळी नेरुळमध्ये पहायला मिळाले. पोलिसांनी हटकून देखील अनेक जण रस्त्यावर पडलेले मासे उचलून पिशवीत भरण्याचा प्रयत्न करत होते. माणुसकीला काळिमा फासणारे हे दृश्य दर्शवणारा व्हिडीओ बुधवारी सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने नागरिकांच्या प्रवृत्तीचे उघड दर्शन घडले आहे.
मंगळवारी सकाळी सायन-पनवेल मार्गावर उरणफाटा येथे घडलेल्या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला असून दोघे जण जखमी झाले आहेत. रस्त्याच्या डांबरीकरणात झालेल्या त्रुटीमुळे रस्ता गुळगुळीत होवून भरधाव वाहने त्याठिकाणी घसरत आहेत. याच प्रकारात समोरील ट्रक घसरून कठड्याला धडकला. या वेळी पाठीमागून येणारी इतर वाहने त्या ट्रकला धडकून हा भीषण अपघात झाला. या वेळी मृतदेह व जखमी रस्त्यावर पडलेल्या ठिकाणापासून १०० ते १५० मीटर अंतरावर एक माशांचा टेंपो देखील पलटी झालेला होता. घटनेची माहिती मिळताच नेरुळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेह व जखमींना रुग्णालयात नेले. नेमके त्याच वेळी घटनास्थळावरुन जाणारे इतर प्रवासी रस्त्यावर पडलेले मासे उचलण्यात व्यस्त होते. चार ते पाच वाहने एकमेकांवर आदळून रस्त्यावर आडवी झालेली असल्यामुळे हा रस्ता रहदारीसाठी बंद करण्यात आलेला होता. त्यामुळे विरुध्द दिशेने जाणाऱ्या मार्गावरील वाहनचालक, प्रवासी देखील थांबून रस्त्यावरील मासे जमा करताना दिसत होते. तर पुलालगतची झोपडपट्टी व परिसरातील काहींनी सोबत ड्रम आणून मासे जमा करत होते. त्यापैकी एकानेही दुर्घटनाग्रस्त व पोलीस यांच्या मदतीसाठी धाव घेतली नाही. प्रवाशांनी त्यांच्या बेशिस्तीचे दर्शन घडवल्याचा संताप व्यक्त होत आहे.

Web Title: TRAVEL OF PRACTICAL FISH

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.