टिटवाळ्यात अपंग मुलींची छेडछाड
By Admin | Updated: October 18, 2014 01:28 IST2014-10-18T01:28:10+5:302014-10-18T01:28:10+5:30
टिटवाळ्यातील डॉ़ आंबेडकर चौकात गुरुवारी रात्नी 9 च्या सुमारास दोन अपंग तरुणी क्लासवरून घरी जात असताना रमेश बकुले व गौरव बकुले या बापलेकाने त्यांची छेड काढून मारहाण केली.

टिटवाळ्यात अपंग मुलींची छेडछाड
टिटवाळा : टिटवाळ्यातील डॉ़ आंबेडकर चौकात गुरुवारी रात्नी 9 च्या सुमारास दोन अपंग तरुणी क्लासवरून घरी जात असताना रमेश बकुले व गौरव बकुले या बापलेकाने त्यांची छेड काढून मारहाण केली. यासंदर्भात टिटवाळा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
येथे राहणा:या या अपंग तरुणी रात्री कोचिंग क्लास संपल्यावर दुचाकीवरून घराकडे जात होत्या. बल्याणी येथील डॉ़आंबेडकर चौकात रमेश बकुले हा दारू पिऊन रस्त्यात उभा होता. या मुलींनी हॉर्न वाजविला, मात्र बाजूला न सरता त्याने एकीची ओढणी खेचली; शिवीगाळही केली. तेवढय़ात त्याचा मुलगा गौरव बकुले तेथे आला. दोघा बापलेकाने त्यांची गाडी अडवून छेडछाड करण्यास सुरुवात केली. या वेळी त्यांनी त्यातील एकीचा कुर्ता फाडून लगट केली. दोघींना बेदम मारहाणदेखील केली. या दोघींना तत्काळ कल्याण येथील रुक्मिणीबाई शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात
आले. (वार्ताहर)
च्टिटवाळा पोलिसांत अपंग संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र जाधव, अध्यक्ष भगवान बनकरी व इतर पदाधिकारी यांनी तक्रार केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पो. नि. व्यंकट आंधळे यांनी सुरू केला असून, तत्काळ गुन्हा दाखल करून मुख्य आरोपी रमेश बकुले यास अटक केली आहे. गौरवचा शोध पोलीस घेत आहेत.