महामार्गासह ठाणे-बेलापूर रोडवर वाहतूककोंडी
By Admin | Updated: September 5, 2015 23:14 IST2015-09-05T23:14:12+5:302015-09-05T23:14:12+5:30
तुर्भे उड्डाणपुलाखाली पडलेल्या खड्यांमुळे ठाणे बेलापूर रोड व सायन - पनवेल महामार्गावर वाहतूक कोंडी होवू लागली आहे. शनिवारी दिवसभर वाहतूक विस्कळीत झाली होती.

महामार्गासह ठाणे-बेलापूर रोडवर वाहतूककोंडी
नवी मुंबई : तुर्भे उड्डाणपुलाखाली पडलेल्या खड्यांमुळे ठाणे बेलापूर रोड व सायन - पनवेल महामार्गावर वाहतूक कोंडी होवू लागली आहे. शनिवारी दिवसभर वाहतूक विस्कळीत झाली होती. खड्डे बुजविले जात नसल्यामुळे चालकांसह नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
ठाणे -बेलापूर रोडवर तुर्भे उड्डाणपुलाखालील पोलिस चौकी ते शरयू हुंडाई कंपनीपर्यंत रोडवर प्रचंड खड्डे पडले आहेत. नागरिकांनी मागणी करूनही खड्डे बुजविले जात नसून वाहतूक कोंडी होत आहे. शनिवारी सकाळी ठाणे - बेलापूर रोडवर एस.के. व्हील्स कंपनीपासून तुर्भे नाक्यापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
500 मिटरचे अंतर कापण्यासाठी १० मिनीट वेळ लागत होता. दुपारपर्यंत वाहतूक अत्यंत धिग्या गतीने सुरू होती. सायन - पनवेल महामार्गावरही पुलावरून सानपाडा सिग्नलपर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. शहरातील दोन्हीही प्रमुख रोडवर चक्का जाम झाल्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली. या परिसरातील रहिवाशांनी व वाहतूकदारांनी खड्डे बुजविण्याची मागणी सार्वजनीक बांधकाम विभाग व महापालिका प्रशासनाकडे केली आहे. रोडच्या एक बाजूला महापालिकेची तर दुसऱ्या बाजूला सार्वजनीक बांधकाम विभागाची हद्द आहे. खड्डे कोणी बुजवायचे असा प्रश्न निर्माण झाला असून त्याचा फटका नागरिकांना बसत आहे. लवकरात लवकर खड्डे बुजवून वाहतूकिची समस्या सोडविण्याची मागणी जोर धरू लागली असून आठ दिवसात खड्डे न बुजविल्यास आंदोलनाचा इशारा तुर्भे नाका परिसरातील रहिवाशांनी दिला आहे.