कोपरा पुलाजवळील वाहतूककोंडी फुटणार

By Admin | Updated: June 2, 2017 06:03 IST2017-06-02T06:03:47+5:302017-06-02T06:03:47+5:30

खारघर शहराचे प्रवेशद्वार असलेल्या कोपरा पुलावरील वाहतूककोंडी थांबणार असून सायन- पनवेल महामार्गाला जोडणाऱ्या

Transportation near the Kopra bridge can spread | कोपरा पुलाजवळील वाहतूककोंडी फुटणार

कोपरा पुलाजवळील वाहतूककोंडी फुटणार

लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल : खारघर शहराचे प्रवेशद्वार असलेल्या कोपरा पुलावरील वाहतूककोंडी थांबणार असून सायन- पनवेल महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्याच्या कामाला सुरु वात झाल्याने याठिकाणाहून ये-जा करणाऱ्या हजारो वाहन चालकांनी यामुळे सुटकेचा नि:श्वास सोडला आहे . विशेष म्हणजे या पुलावर सकाळ, सायंकाळी सुमारे ३० मिनिटापेक्षा जास्त वेळ वाहतूककोंडी होत होती.
यासंदर्भात खारघर जिमखाना स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष व खारघर ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच गुरु नाथ गायकर यांनी सिडकोकडे होणारी वाहतूककोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्गाची मागणी केली होती. आमदार प्रशांत ठाकूर यांनी देखील यासंदर्भात सिडकोकडे पत्रव्यवहार करून या रस्त्याला पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. खारघर शहरात जाण्यासाठी दोन मार्गिका आहेत. कोपरा गावाजवळील उड्डाणपूल व हिरानंदानी उड्डाणपुलाखालून खारघर शहरात प्रवेश करता येतो. सायन- पनवेल महामार्गावरून खारघर शहरात प्रवेश करताना हा मार्ग अनेक वर्षांपासून वाहनचालकांची वहिवाट बनला असल्याने दररोज हजारो वाहने याठिकाणाहून ये-जा करत असतात. शहराचा झपाट्याने विकास झाल्याने वाहनांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कोपरा पुलावरील वाहतूककोंडी टाळण्यासाठी सिडकोने या पुलाला समांतर असा तात्पुरत्या स्वरूपाचा पूल बांधला. मात्र तरी देखील वाहतूककोंडी सुटत नसल्याने सिडकोने सायन-पनवेल महामार्गाला पनवेलच्या जाणाऱ्या मार्गावर डांबरी रस्त्याच्या कामाला सुरु वात केली आहे. यामुळे कोपरा उडाणपुलाजवळ होणारी वाहतूक कोंडी कमी होऊन पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना कोणताही अडथळा निर्माण न होता थेट पनवेलच्या दिशेने जाता येणार आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या तोंडावर सिडकोने या रस्त्याच्या कामाला सुरु वात केल्याने नागरिकांकडून आनंद व्यक्त करण्यात येत आहे .

कोपरा पुलावरील वाहतूककोंडी ही याठिकाणच्या महत्त्वाची समस्या बनली होती. नागरिकांच्या तक्र ारी देखील आमच्याकडे आल्या होत्या. याठिकाणची वाहतूककोंडी समस्या सोडविण्यासाठी आम्ही तत्काळ या ठिकाणच्या रस्त्याच्या कामाला सुरु वात केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाशी समन्वय साधून लवकरच हा मार्ग वाहतुकीस खुला केला जाईल.
- सीताराम रोकडे, प्रशासक,
खारघर सिडको.

मनपाच्या उदासीनतेचा फटका
खारघर शहरातील या प्रवेशद्वाराची वाहतूक सुरळीत करण्यासाठी सिडकोच्या वतीने याठिकाणी मोठ्या पुलाच्या कामाला देखील सुरुवात के ली आहे. मात्र, नवी मुंबई महानगर पालिकेला पाणीपुरवठा करणारी मोरबे धरणाची जलवाहिनी या पुलाच्या आड आल्याने मागील दोन वर्षे या पुलाचे काम रखडले आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या मार्फत जोपर्यंत या जलवाहिनीला या ठिकाणी हलविण्यासाठी प्रयत्न केले जात नाही, तोपर्यंत या पुलाचे काम असेच रेंगाळत राहणार आहे.

Web Title: Transportation near the Kopra bridge can spread

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.