शहरं
Join us  
Trending Stories
1
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
2
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
3
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
5
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
6
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
7
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
8
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

निवृत्तीच्या टप्प्यावर तीन सहायक आयुक्तांच्या बदल्या; चौकशीतून बचावासाठी जागा बदलाची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2021 12:41 AM

नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपिनकुमार सिंह यांनी २० जानेवारीला तीन सहायक आयुक्तांच्या बदल्यांचे आदेश काढले.

सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई : पोलीस आयुक्तांनी नुकतीच तीन सहायक आयुक्तांच्या जागांंमध्ये बदल केला आहे. त्यापैकी दोघांची चार महिन्यांवर निवृत्ती आहे. ऐन निवृत्तीच्या टप्प्यात बदल्या करण्यामागे अधिकाऱ्यांची पाठराखण करण्याची शक्यता आहे.

नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपिनकुमार सिंह यांनी २० जानेवारीला तीन सहायक आयुक्तांच्या बदल्यांचे आदेश काढले. त्यानुसार सहायक आयुक्त रवींद्र गिड्डे, नितीन भोसले पाटील व भागवत सोनावणे यांच्यात ही अदलाबदल करण्यात आली आहे. मात्र गिड्डे व भोसले पाटील यांची मे २०२१ मध्ये निवृत्ती आहे. त्यामुळे ऐन निवृत्तीपूर्वी अवघ्या चार महिन्यांवर गिड्डे यांना पनवेल विभागातून नवी मुंबई महापालिका अतिक्रमण विभागात तर भोसले पाटील यांना पनवेल वाहतूक शाखेतून पनवेल विभाग व सोनावणे यांना अतिक्रमणमधून पनवेल वाहतूक शाखेचा पदभार देण्यात आला आहे.

या बदल्यांमागे बचावाचे कारण असल्याची चर्चा पोलीस अधिकाऱ्यांमध्ये सुरू आहे. एका सहायक आयुक्तांच्या विरोधात पोलीस महासंचालकांकडे तक्रारी गेल्या आहेत. एका प्रकरणात झालेल्या निष्काळजीमुळे या तक्रारी केल्या त्यात इतरही काही अधिकाऱ्यांच्या प्रतिमेला डाग लागू शकतो. 

चौकशीचे आदेश नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी २० जानेवारीला तीन सहायक आयुक्तांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत. महासंचालक कार्यालयाकडून तत्कालीन आयुक्त, व इतर संबंधित अधिकाऱ्यांच्या चौकशीचे आदेश आले आहेत. यातून त्यांची चौकशी टाळण्यासाठी या बदल्या झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. रवींद्र गिड्डे, नितीन भोसले पाटील व भागवत सोनावणे अशी त्यांची नावे आहेत. 

टॅग्स :Policeपोलिस