नवी मुंबई महानगर पालिकेतील विभाग अधिकारी यांच्या बदल्या
By नामदेव मोरे | Updated: October 3, 2023 22:53 IST2023-10-03T22:52:04+5:302023-10-03T22:53:31+5:30
नवी मुंबई महानगरपालिकेतील विभाग अधिका-यांच्या मंगळवारी बदल्या करण्यात आल्या.

नवी मुंबई महानगर पालिकेतील विभाग अधिकारी यांच्या बदल्या
नवी मुंबई: नवी मुंबई महानगरपालिकेतील विभाग अधिका-यांच्या मंगळवारी बदल्या करण्यात आल्या. आरोग्य विभागातील डाॅ. कैलास गायकवाड यांना दिघा विभाग अधिकारी पदाची जबाबदारी दिली आहे.
तुर्भे नागरी आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी असलेल्या कैलास गायकवाड यांनी यापुर्वी अतिक्रमण विभागाचा कार्यभारही सांभाळला होता. त्यांना आता दिघा विभाग प्रमुख म्हणून जबाबदारी दिली आहे. सागर मोरे यांची वाशी , सुनील काठोळे यांची कोपरखैरणे व शंकर खाडे यांची परिमंडळ दोन मध्ये बदली करण्यात आली आहे.महानगर पालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी मंगळवारी या बदल्या केल्या असून संबंधित अधिका-यांना तत्काळ बदलीच्या ठिकाणी हजर राहण्यास सांगितले आहे.