बदल्या तसेच बढत्या झालेले अधिकारी
By Admin | Updated: May 14, 2016 02:43 IST2016-05-14T02:43:30+5:302016-05-14T02:43:30+5:30
राज्य सरकारने राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून, त्याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यानुसार हेमंत नागराळे हे आता नवी मुंबईचे पोलीस आयुक्त असतील

बदल्या तसेच बढत्या झालेले अधिकारी
मुंबई : राज्य सरकारने राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून, त्याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यानुसार हेमंत नागराळे हे आता नवी मुंबईचे पोलीस आयुक्त असतील, तर अतुलचंद्र कुलकर्णी यापुढे दहशतवादविरोधी पथकात काम करतील.
विवेक फणसळकर यांची बदली लाचलुचपत प्रतिबंधक विभागात करण्यात आली असून, प्रज्ञा
सरवदे यांना प्रशासन विभागात आणण्यात आले आहे. सरकारने अतिरिक्त महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांना महासंचालकपदी
तर महानिरीक्षकांना अतिरिक्त महासंचालक म्हणून बढती देण्यात आली आहे.
मुंबई : राज्य सरकारने बदली केलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची यादी पुढीलप्रमाणे-
अतिरिक्त महासंचालक : प्रभात रंजन (बॅच १९८४) यांची नवी मुंबईच्या आयुक्तपदावरून महासंचालक, लीगल एन्ड टेक्निकल या पदी (मीरा बोरवणकर यांच्या केंद्रातील नियुक्तीने रिक्त झालेल्या) नेमणूक.
व्ही. डी. मिश्रा (१९८९) यांची अतिरिक्त महासंचालक, आस्थापना या पदावरून महासंचालकपदी पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळावर.
बी. के. सिंग (१९९0) यांची विशेष महानिरीक्षक कारागृह या पदावरून अतिरिक्त महासंचालकपदी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात.
एस. के. वर्मा (१९९0) विशेष महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र यांची अतिरिक्त महासंचालकपदी म्हाडाच्या मुख्य दक्षता आयुक्तपदी मुंबईत नियुक्ती.
के. एल. बिष्णोई (१९८५) यांची अतिरिक्त महासंचालक कायदा सुव्यवस्था ते अतिरिक्त महासंचालक तथा महाव्यवस्थापक महाराष्ट्र पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळावर.
हेमंत नागराळे (१९८७) यांची अतिरिक्त महासंचालक पदावरून नवी मुंबई पोलीस आयुक्तपदी नेमणूक.
के. के. सरंगल (१९९0) यांची विशेष महानिरीक्षक ते अतिरिक्त महासंचालक मुख्य सतर्कता
आयोग, विक्र ीकर विभाग, मुंबई येथे पदोन्नती.
विनायक कोरगावकर (१९९0) यांची विशेष महानिरीक्षक व मुख्य दक्षता आयुक्त विक्र ीकर विभाग येथून त्याच पदी सिडको, नवी मुंबईत नियुक्ती.
अतुलचंद्र कुलकर्णी (१९८९) यांची अतिरिक्त महासंचालक तथा सहपोलीस आयुक्त कायदा व सुव्यवस्था पदावरून अतिरिक्त महासंचालक, दहशतवादविरोधी पथक या ठिकाणी नेमणूक.
विवेक फणसळकर (१९८९) : अतिरिक्त महासंचालक, दहशतवादविरोधी पथक येथून लाचलुचपत प्रतिबंधक विभागात.
व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण (१९९0) यांची अतिरिक्त महासंचालक, प्रशासन ते नियोजन, महासंचालक कार्यालयात नियुक्ती
राजेंद्र सिंग (१९८९) यांची बदली अतिरिक्त महासंचालक नियोजन ते अतिरिक्त महासंचालक, प्रोव्हिजन्स या ठिकाणी नेमणूक
प्रज्ञा सरवदे (१९८९) यांची अतिरिक्त महासंचालक तथा मुख्य दक्षता आयुक्त सिडको ते अतिरिक्त महासंचालक, प्रशासन या पदी नेमणूक (प्रतिनिधी)