रुळाला तडा गेल्याने ट्रान्स हार्बर ठप्प, शुक्रवारी दुपारची घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 06:28 IST2019-03-09T06:28:25+5:302019-03-09T06:28:28+5:30

ट्रान्स हार्बरवर तुर्भे ते जुईनगरदरम्यान रुळाला तडा गेल्याचा प्रकार शुक्रवारी दुपारी घडला.

Trance harbor jam when the Rola collapsed, Friday afternoon incident | रुळाला तडा गेल्याने ट्रान्स हार्बर ठप्प, शुक्रवारी दुपारची घटना

रुळाला तडा गेल्याने ट्रान्स हार्बर ठप्प, शुक्रवारी दुपारची घटना

नवी मुंबई : ट्रान्स हार्बरवर तुर्भे ते जुईनगरदरम्यान रुळाला तडा गेल्याचा प्रकार शुक्रवारी दुपारी घडला. यामुळे पनवेलकडून ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या लोकल थांबविल्याने काही वेळासाठी रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला. सुमारे तासाभराने दुरुस्तीकाम पूर्ण झाल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.
पनवेलकडून ठाण्याकडे जाणारी लोकल जुईनगर स्थानकातून तुर्भेकडे येत असताना रुळामध्ये बिघाड असल्याचे मोटरमनच्या निदर्शनास आले. त्यानंतर दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास सदर ठिकाणी रुळाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. याकरिता ट्रान्स हार्बर मार्गावरील ठाण्याकडे जाणाऱ्या लोकल थांबविण्यात आल्या होत्या. त्यामुळे नेरूळ व पनवेल येथून ठाण्याकडे जाण्यासाठी सुटलेल्या सर्व लोकल जागीच थांबविण्यात आल्या होत्या. याचा रेल्वे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. अखेर सुमारे एक तासामध्ये रुळातील बिघाड दुरुस्त झाल्यानंतर ट्रान्स हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक सुरळीत झाली.

Web Title: Trance harbor jam when the Rola collapsed, Friday afternoon incident