तीन दिवसांपासून ठाण्यात पेटतात गाड्या
By Admin | Updated: January 4, 2015 02:15 IST2015-01-04T02:15:05+5:302015-01-04T02:15:05+5:30
वागळे इस्टेट येथील किसननगर परिसरात काही समाजकंटकांनी चार वाहने पेटवून दिल्याची घटना शनिवारी पहाटे घडली.

तीन दिवसांपासून ठाण्यात पेटतात गाड्या
ठाणे : वागळे इस्टेट येथील किसननगर परिसरात काही समाजकंटकांनी चार वाहने पेटवून दिल्याची घटना शनिवारी पहाटे घडली. तर नव्या वर्षाच्या पहिल्या तीन दिवसांत वाहने पेटण्याच्या आणि त्यांना आग लागण्याच्या घटनांत आठ वाहने जळाली असून, त्यामध्ये दोन रेल्वे आणि शहर पोलिसांच्या गाड्यांचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
१ जानेवारीलाच काजूवाडीतील सर्व्हिस रोडवर एक कार पेटली. तर २ जानेवारीला दिवा येथील रेल्वे आंदोलनादरम्यान समाजकंटकांनी जीआरपी आणि शहर पोलिसांच्या प्रत्येकी एकेका गाडीसह अन्य एक दुचाकी पेटवून दिली. त्यानंतर, ३ जानेवारीला पहाटे किसननगर, नंबर ३ येथे दोन चारचाकी आणि दोन दुचाकी वाहने जाळण्यात आली. या तीन दिवसांत वाहनांना लागलेल्या आगी ठामपा अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने धाव घेत आटोक्यात आणल्या असून, यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. (प्रतिनिधी)