पनवेल महापालिकेतर्फे इच्छुक उमेदवारांना प्रशिक्षण
By Admin | Updated: April 27, 2017 00:11 IST2017-04-27T00:11:08+5:302017-04-27T00:11:08+5:30
राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार पनवेल महापालिकेतर्फे आॅनलाइन नामनिर्देशन पत्र भरण्याबाबत सर्वपक्षीय उमेदवारांना

पनवेल महापालिकेतर्फे इच्छुक उमेदवारांना प्रशिक्षण
पनवेल : राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार पनवेल महापालिकेतर्फे आॅनलाइन नामनिर्देशन पत्र भरण्याबाबत सर्वपक्षीय उमेदवारांना तसेच पालिका अधिकारी आणि सायबर कॅफे चालकांनाही बुधवारी प्रशिक्षण देण्यात आले. शहरातील वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहामध्ये हा कार्यक्रम पार पडला. या वेळी महाराष्ट्राने आॅनलाइन अर्जप्रक्रि या सुरू केली असल्याची माहिती
निमंत्रित उपायुक्त अविनाश सणस यांनी दिली.
यावेळी महापालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर, निमंत्रित उपायुक्त अविनाश सणस, पनवेल मनपाचे उपायुक्त मंगेश चितळे हेसुद्धा उपस्थित होते. पनवेल महापालिका सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा झालेली आहे. २९ एप्रिलपासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात येणार असून राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार आॅनलाइन अर्ज भरावा लागणार आहे. त्यासंदर्भात सर्वपक्षीय उमेदवारांना महापालिका प्रशासनाने प्रशिक्षण आयोजित केले होते. (प्रतिनिधी)