गाडय़ा गेल्या, पैसे गेले, हाती राहिली कागदपत्रे
By Admin | Updated: November 28, 2014 00:23 IST2014-11-28T00:23:21+5:302014-11-28T00:23:21+5:30
सेकंड हॅन्ड चारचाकी वाहनांची विक्री करणा:या नेरूळ येथील एका भामटय़ाने विक्रीसाठी दिलेल्या वाहनांसहित पोबारा केला.

गाडय़ा गेल्या, पैसे गेले, हाती राहिली कागदपत्रे
कामोठे : सेकंड हॅन्ड चारचाकी वाहनांची विक्री करणा:या नेरूळ येथील एका भामटय़ाने विक्रीसाठी दिलेल्या वाहनांसहित पोबारा केला. त्याच्याविरोधत सुमारे 26 तक्रारी आल्या असून एनआरआय पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. त्याच्या पत्नीला मंगळवारी अटक करण्यात आली. या प्रकारामुळे गाडी मालकांच्या तोंडचे मात्र पाणी पळाले आहे. गाडी गेली, पैसे गेले, हाती राहिली कागदपत्रे अशी त्यांची स्थिती झाली आहे.
नवी मुंबई आणि पनवेल परिसरात सेकंड हॅन्ड गाडय़ांच्या विक्रीसाठी अनेक दलालांनी दुकाने थाटली आहेत. वसाहतीत रस्त्यावर वाहने उभी करून ‘फॉर सेल’ असे पोस्टर लावून मार्केटिंग केले जाते. मालकांकडून कमी किमतीत गाडय़ा घेऊन त्या जास्त दराने विकणो हा त्यांचा व्यवसाय आहे. सीवूड येथील सेक्टर न्यू/5क् मध्ये माऊल सोसायटीत गाळा क्रमांक 6 येथे नाझीर याने अशाच प्रकारे व्यवसाय थाटला होता. हा गाळा त्याने भाडे तत्त्वावर घेतला होता. ग्राहकांना गळ घालण्यात तो पटाईत असल्याने अनेकांनी आपली वाहने विक्रीकरिता नाझीरकडे दिली होती. ‘थोडे दिवस गाडी इथे ठेवा. चांगली किंमत मिळवून देतो,’ असे तो मालकांना सांगत असे. त्यामुळे अनेक गाडीमालकांनी डोळे झाकून वाहने त्याच्याकडे दिली होती. नाझीर टप्प्या टप्प्याने ही वाहने दुसरीकडे हलवत असे. तुमची गाडी विकली आहे. पुढच्या आठवडय़ात येऊन पैसे घेऊन जा, असे सांगत तो हेलपाटे मारायला लावत असे. काहींना तर तो, ‘तुमच्या कारचा माङयाकडून अपघात झाला आहे. पण काळजी करू नका. पुढच्या महिन्यात पहिल्या आठवडय़ात या आणि पैसे घेऊन जा,’ असे सांगून तो समजूत काढत असे. त्याने अनेकांना दिवाळीनंतर पैसे घेण्यासाठी बोलावले होते, मात्र एके दिवशी एकही वाहन न ठेवता त्याने पोबारा केला. रोज तिथे फे:या घालून कंटाळलेल्या कारमालकांनी अखेर एनआरआय सागरी पोलीस ठाण्यात तक्रारी केल्या. नाझीर आणि त्याच्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. (वार्ताहर)
पसार झालेल्या नाझीरचा o्रीवर्धन येथील मूळगावी शोध घेण्यात आला, पण तो सापडला नाही. पत्नीच्या चौकशीतून या प्रकरणाचे धागेदोरे हाती येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आरोपींनी सुमारे एक कोटी रुपयांच्या वाहनांचा अपहार केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्याची पत्नी या ‘टोटल कार पॉइंट’मध्ये कॅशिअर असल्याने एनआरआय पोलिसांनी तिला मंगळवारी अटक केली. तिला पोलीस कोठडी ठोठावली आहे. या प्रकरणचा तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप बेंद्रे करीत आहेत.
कागदपत्र मालकांकडेच
विक्रीकरिता दिलेल्या कारची कागदपत्रे मालकांकडेच असून त्यांनी ‘टोटल कार पॉइंट’ला ङोरॉक्स प्रती दिल्या होत्या. त्यामुळे या वाहनांची नियमानुसार विक्री करण्यात आली नसावी. ती नंबर प्लेट बदलून वापण्यात येत असावीत किंवा त्यांच्या सुटय़ा भागांची विक्री करण्यात आली असावी, असा अंदाज व्यक्त होत आहे.