ट्रेलर-मोटारसायकल अपघात १ ठार;२ जखमी

By Admin | Updated: October 9, 2015 23:34 IST2015-10-09T23:34:17+5:302015-10-09T23:34:17+5:30

उरण परिसरातील नितेश भोईर हा आपल्या दुचाकीवरून (एमएच ४६ वाय ८०१९) प्रमोद पंडित (४०) व अतिश भोईर (१७) या दोघांसह उरणकडे येत होता. खोपटा मार्गावरील बामरलॉबी

Trailer-motorcycle accident killed 1; 2 injured | ट्रेलर-मोटारसायकल अपघात १ ठार;२ जखमी

ट्रेलर-मोटारसायकल अपघात १ ठार;२ जखमी

उरण : उरण परिसरातील नितेश भोईर हा आपल्या दुचाकीवरून (एमएच ४६ वाय ८०१९) प्रमोद पंडित (४०) व अतिश भोईर (१७) या दोघांसह उरणकडे येत होता. खोपटा मार्गावरील बामरलॉबी कंटेनर यार्डजवळ रोडवेज इंटरनॅशनल ट्रान्सपोर्ट कंपनीच्या ट्रेलरने (पीबी १० डीके १०८३) दुचाकीवरील तिघांना जोरदार धडक दिल्याने नितेश भोईर हा युवक जागीच ठार झाला. प्रमोद पंडित, अतिश भोईर हे दोघे गंभीर जखमी असून त्यांना कळंबोलीतील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
धडक देणारा ट्रेलर हा पोलिसांच्या ताब्यात असून चालक मात्र फरारी आहे. उरण पोलीस ठाणे या घटनेचा अधिक तपास करीत आहे.
जेएनपीटी परिसरात दिवसेंदिवस अपघातांची मालिका सुरूच आहे. उरण तालुका हा अपघातांचा झोनच बनला आहे. नितेश या युवकाच्या मृत्यूने मोठी जुई गावावर शोककळा पसरली आहे. उरण तालुक्यात वारंवार अशा प्रकारचे अपघात होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. (वार्ताहर)

Web Title: Trailer-motorcycle accident killed 1; 2 injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.