शिवाजी चौक, कोपरा पूल, कळंबोली सर्कलजवळ वाहतूककोंडीचा त्रास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2020 23:27 IST2020-11-11T23:26:34+5:302020-11-11T23:27:52+5:30
इंधनाचा अपव्यय तर होतोच, शिवाय अनेकांना तासन् तास वाहतूककोंडीत अडकून राहावे लागत आहे.

शिवाजी चौक, कोपरा पूल, कळंबोली सर्कलजवळ वाहतूककोंडीचा त्रास
- वैभव गायकर
पनवेल: दिवाळी तोंडावर आल्याने शहरात मोठ्या संख्येने नागरिक घराबाहेर पडत असून, वाहतूककोंडी होत आहे. पनवेल शहरासह खारघर वाहतूक पोलिसांच्या नियोजनाच्या अभावामुळे ही समस्या उद्भवली असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. पनवेल पालिका हद्दीत पनवेल शहर, नवीन पनवेल, कळंबोली, खारघर येथे मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी आहे.
यामुळे इंधनाचा अपव्यय तर होतोच, शिवाय अनेकांना तासन् तास वाहतूककोंडीत अडकून राहावे लागत आहे. कोरोनाकाळात लॉकडाऊनमुळे अनके जण घरात बसणे पसंत करत होते. मात्र अनलॉक सुरू झाल्याने तसेच काही प्रमाणात कोविडची साथ नियंत्रणात आल्याने नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडत आहेत. ट्रेन बंद असल्याने नागरिक खाजगी वाहनांचा वापर निश्चित स्थळी पोहोचण्यासाठी मोठ्या प्रमाणात करीत असल्याने वाहनांची वर्दळ वाढली आहे.