मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी
By Admin | Updated: September 29, 2014 03:10 IST2014-09-29T03:10:22+5:302014-09-29T03:10:22+5:30
राजकीय प्रचाराचा माहोल आणि नवरात्रौत्सवाची धूम सर्वत्र सुरू असल्याने त्याचा फटका मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहनचालकांना बसला

मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी
पेण : राजकीय प्रचाराचा माहोल आणि नवरात्रौत्सवाची धूम सर्वत्र सुरू असल्याने त्याचा फटका मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहनचालकांना बसला. वाहनांची गर्दी उसळल्याने पेणच्या खारपाडा ते वडखळ या तब्बल १० कि.मी परिसरात महामार्गावर रविवारी वाहतूक कोंडी झाली. निवडणुकांचे दिवस आणि नवरात्रौत्सव यामुळे देवदर्शनाला येणारे भाविक आणि राजकीय पक्ष कार्यकर्त्यांचा पेण मतदार संघात सुरू असलेला प्रचाराचे जथ्थे,पर्यटकांची वाहने, मालवाहू अवजड वाहने यांच्या गर्दीमुळे वाहतूक पोलिसांच्या ढिसाळ नियोजनामुळे सध्या महामार्गावर रोजच सायंकाळी वाहतूक कोंडी होत आहे. पेण परिसरात देवीची अनेक मंदीरे असून या देवींच्या दर्शनासाठी नवरात्रौत्सवात वर्षाकाठी मुंबई, ठाणे, उपनगर, नवी मुंबई, उरण परिसरातील आगरी-कोळी समाज देवदेवतांच्या व कुलदैवताच्या दर्शनासाठी येतो त्याचबरोबरीने परिसरातील स्थानिक नागरिक कुटुबांसहित वाहनाने देवदर्शनास जातात. त्यामुळे रविवारी महामार्गावर राजकीय कार्यकर्त्यांबरोबर, देवी दर्शनासाठी आलेले भाविक आणि अलिबाग, मुरूड, श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यांवर येणारी पर्यटकांची वाहने, मालवाहतूक वाहने, प्रवासी बसेस, तसेच शहरात धावणा-या विक्रम- मिनीडेअर यांच्यात एकमेकांना ओव्हरटेक करण्यामुळे जागोजागी वाहतूक कोंडी होेते. सध्या वाहतूक पोलिस यंत्रणा व पोलिस यंत्रणेला निवडणूक कामात संरक्षणात असल्याने या ठिकाणी कोडींचा मुद्दा गंभीर बनला आहे . (वार्ताहर)