स्वातंत्र्योत्सवासाठी शहरवासीय सज्ज
By Admin | Updated: August 14, 2015 23:48 IST2015-08-14T23:48:47+5:302015-08-14T23:48:47+5:30
स्वातंत्र्य दिनानिमित्त शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सरकारी कार्यालये, शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्था, गृहनिर्माण संस्था, पोलीस ठाणी

स्वातंत्र्योत्सवासाठी शहरवासीय सज्ज
नवी मुंबई : स्वातंत्र्य दिनानिमित्त शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सरकारी कार्यालये, शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्था, गृहनिर्माण संस्था, पोलीस ठाणी अशा अनेक ठिकाणी ध्वजारोहण तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम, रक्तदान शिबिर आदी सामाजिक उपक्रम राबविले जाणार आहेत.
नवी मुंबई महानगरपालिका आयुक्तालयात सकाळी ८ वाजून ३० मिनिटांनी ध्वजारोहण करून राष्ट्र ध्वजाला मानवंदना दिली जाणार आहे. यावेळी नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनवणे, उपमहापौर अविनाश लाड, आयुक्त दिनेश वाघमारे तसेच सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. सकाळी ९ वाजून ५ मिनिटांनी बेलापूर येथील कोकण भवन इमारतीच्या प्रांगणात कोकण विभागीय स्तरावरील राष्ट्रध्वज वंदन समारंभाचे आयोजन केले आहे. शहरातील सर्वच शाळांमध्ये सकाळी ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली जाणार आहे.
शाळांमधील विद्यार्थी थोर पुरुषांच्या वेषभूषा धारण करून इतिहासाला उजाळा देणार आहेत. सीबीडी सेक्टर आठ परिसरातील सह्याद्री सोसायटीच्या वतीने रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.