पर्यटकांच्या उत्साहाला उधाण

By Admin | Updated: July 25, 2016 03:14 IST2016-07-25T03:14:24+5:302016-07-25T03:14:24+5:30

पावसाळा सुरू होताच शहरातील पर्यटनस्थळांवर मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते. नागरिकांच्या सुरक्षेसाठी पर्यटनस्थळांवर पोलीस तैनात केले असतानाही वर्षा सहलीचा आनंद घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी

Tourists excite the excitement | पर्यटकांच्या उत्साहाला उधाण

पर्यटकांच्या उत्साहाला उधाण

प्राची सोनावणे,  नवी मुंबई
पावसाळा सुरू होताच शहरातील पर्यटनस्थळांवर मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते. नागरिकांच्या सुरक्षेसाठी पर्यटनस्थळांवर पोलीस तैनात केले असतानाही वर्षा सहलीचा आनंद घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळते. पर्यटनस्थळांवरील बंदीमुळे पर्यटकांनी इतर पर्याय निवडले. वर्षा सहलीची हौस पूर्ण केली जात आहे. गाढेश्वर, देहरंग, पांडवकडा अशा ठिकाणी पर्यटकांनी शॉटकर्टचा मार्ग निवडला आहे.
पर्यटनस्थळांवर पोलिसांचा चोख बंदोबस्त असल्याने पर्यटकांनी दुसरा पर्याय निवडला असून, पाण्यात भिजण्याचा मनसोक्त आनंद लुटत आहेत. पनवेल परिसरातील गाढेश्वर धरण, खारघरमधील पांडवकडा, देहरंग धरण, मोरबे आदी परिसरात पर्यटनाची लाट उसळली आह. पर्यटनाकरिता तरुणवर्गाचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून येत आहे. पोलिसांचा बंदोबस्त असल्याने त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी दुसऱ्या मार्गाचा शोध घेऊन त्या ठिकाणी पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. शनिवार, रविवारी पर्यटनस्थळांवर मोठ्या प्रमाणात गर्दी केली जाते. धरण, नदी परिसात ज्या ठिकाणी वाहते पाणी आहे, असे ठिकाण गाठून भिजण्याचा मनसोक्त आनंद पर्यटकांकडून घेतला जात आहे.
पाण्यातील सुरक्षेबाबात पर्यटक निष्काळजीपणाने असून सेल्फीची क्रेझ जीवघेणी ठरू शकते. असे असतानाही कुटुंबीय, मित्रपरिवार, नातेवाइकांसोबत सेल्फी घेण्यासाठी पाण्यात उतरताना दिसत होते.

तरुणाईमध्ये ट्रेकिंगची क्रेझ
पावसाळ््यातही अनेकांकडून ट्रेकिंगची हौस पूर्ण केली जात आहे. सीबीडीतील सेक्टर आठ परिसरात मान्सून ट्रेकिंगची हौस पूर्ण करण्यासाठी तरुणवर्गाने मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.
नवी मुंबईचे सौंदर्य उंचावरून पाहण्यासाठी वर्षभर या ठिकाणी पर्यटक भेट देतात. पनवेल, रायगड, ठाणे, नवी मुंबई परिसरातील ट्रेकर्स मोठ्या संख्येने येथे भेट देत आहेत.

Web Title: Tourists excite the excitement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.