आजी-आजोबांचे नातीवर अत्याचार
By Admin | Updated: November 23, 2014 01:16 IST2014-11-23T01:16:03+5:302014-11-23T01:16:03+5:30
जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात नांदवी गावात राहणा:या पाच वर्षाच्या मुलीवर केरळमधील त्रिचूर जिल्ह्यातील थम्मकुडम गावात शारीरिक व मानसिक अत्याचार झाला आहे.

आजी-आजोबांचे नातीवर अत्याचार
जयंत धुळप - अलिबाग
जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात नांदवी गावात राहणा:या पाच वर्षाच्या मुलीवर केरळमधील त्रिचूर जिल्ह्यातील थम्मकुडम गावात शारीरिक व मानसिक अत्याचार झाला आहे. या प्रकरणी केरळमधील उषा धनंजयन, निजल धनंजयन आणि रिज्जू या तिघांविरुद्ध गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आाला आहे. अत्याचार करणारे हे त्या मुलीचे सख्खे आजी-आजोबाच असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मुलीचे वडील अतिफ पोपेरे हे मूळचे माणगाव तालुक्यांतील नांदवी गावचे आहेत. नोकरीनिमित्त ते काही वर्षापूर्वी दुबईला गेले. तिथेच ख्रिश्चन मुलीशी त्यांनी विवाह केला. पीडित मुलगी तीन वर्षाची असताना आतिफ आणि त्याच्या पत्नीत वाद सुरू झाले आणि त्याने तिचा खून केला. दुबई पोलिसांनी अतिफला अटक केली असून, सध्या तो दुबईतल्या तुरुंगातच शिक्षा भोगत आहे.
आईच्या खुनानंतर बालिकेचा सांभाळ नांदवीतील (माणगाव) तिच्या वडिलांची आई फैरोज कमरुद्दीन पोपेरे यांनी करावा, मात्र दिवाऴीच्या सुट्टीत सात दिवस तर उन्हाळी सुट्टीत पंधरा दिवस तिला तिच्या मृत आईचे पिता निजल धनंजयन व उषा धनंजयन यांच्याकडे पाठवण्यात यावे, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले.
त्यानुसार उषा धनंजयन व निजल धनंजयन यांनी 19 ऑक्टोबरला मुलीला केरळमध्ये नेले व अत्याचार केले. सुट्टी संपल्यावर ती जेव्हा पुन्हा नांदवी येथे आजी फैरोजकडे आली तेव्हा केरळमध्ये आपल्यावर अत्याचार झाल्याचे तिने आजीला सांगितले. त्यानुसार फैरोज कमरुद्दीन पोपेरे यांनी गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार केली.
केरळमध्ये घेतला आरोपींचा शोध
गोरेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आप्पासाहेब लेंगरे आणि माणगाव पोलीस उप विभागीय अधिकारी अमोल ङोंडे-पाटील यांनी मुलीचे केरळमधील आजीआजोबा उषा धनंजयन व निजल धनंजयन यांचा केरळमधील ठावठिकाणा शोधला. त्या दोघांसह रिज्जू अशा तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचे घटनास्थळ केरळमध्ये आहे. प्राथमिक गुन्हे अहवाल केरळ पोलिसांकडे देण्यात यावा की थेट महाराष्ट्र पोलिसांनीच तपास करावा, याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल.