चार अल्पवयीन मुलींवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2016 03:06 IST2016-02-15T03:06:27+5:302016-02-15T03:06:27+5:30

रायगड जिल्ह्यातील चार ठिकाणी अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. पैकी दोन घटनांमध्ये दोन पीडित या गर्भवती राहिल्याने अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे

Torture on four minor girls | चार अल्पवयीन मुलींवर अत्याचार

चार अल्पवयीन मुलींवर अत्याचार

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील चार ठिकाणी अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. पैकी दोन घटनांमध्ये दोन पीडित या गर्भवती राहिल्याने अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अत्याचार करणाऱ्या नराधमांना कायद्याचा धाक राहिला नसल्याने जिल्ह्यातील कायदा, सुव्यवस्था आणि सुरक्षितता पुरती कोलमडून पडल्याचे दिसून येते.
पेण येथील दादर सागरी पोलीस ठाणे हद्दीतील एका १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर जानेवारी ते आॅक्टोबर २०१५ या कालावधीत अत्याचार करण्यात आले होते. त्यामुळे ती पीडित अल्पवयीन मुलगी आठ महिन्यांची गर्भवती राहिली आहे. मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला ती मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असतानाही त्याने हे कृत्य केल्याचे मुलीच्या आईने फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेची नोंद दादर सागरी पोलीस ठाण्यात आहे. खालापूर तालुक्यातील वाशिवली येथील उल्पवयीन मुलीला फूस लावून सहा महिन्यांपूर्वीपासून ते १२ फेब्रुवारी २०१६ या कालावधीत तिच्यावर अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले असून, या घटनेची नोंद रसायनी पोलीस ठाण्यात झाली आहे.
अलिबाग तालुक्यातील बांधण येथे राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवरही शारीरिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. या मुलीच्या अज्ञानपणाचा गैरफायदा घेऊन तिच्यावर अत्याचार केले. पीडितेच्या आईवडिलांना मारण्याची धमकी आरोपीने दिली होती, अशी माहिती फिर्यादीने पोलिसांना दिली आहे. पीडित मुलगी आता नऊ महिन्यांची गर्भवती आहे.(प्रतिनिधी)

Web Title: Torture on four minor girls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.