कर्जतमध्ये मशाल मिरवणूक
By Admin | Updated: January 3, 2016 00:37 IST2016-01-03T00:37:40+5:302016-01-03T00:37:40+5:30
तालुक्यातील हुतात्मा वीर भाई कोतवाल आणि हुतात्मा हिराजी पाटील यांच्या बलिदान दिनानिमित्त कर्जतमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. हुतात्मा स्मृती समितीच्या

कर्जतमध्ये मशाल मिरवणूक
कर्जत : तालुक्यातील हुतात्मा वीर भाई कोतवाल आणि हुतात्मा हिराजी पाटील यांच्या बलिदान दिनानिमित्त कर्जतमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. हुतात्मा स्मृती समितीच्या वतीने कर्जत शहरात मशाल मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली. या प्रसंगी विनोबा निवासी मूकबधिर विद्यार्थ्यांसह कर्जतकर उपस्थित होते.
कर्जतच्या टिळक चौकात हुतात्मा बलिदान दिनाचे आयोजन करण्यात आले होते. हुतात्मा व्यायामशाळेचे अध्यक्ष यांच्या हस्ते क्रांतिज्योत प्रज्वलित करून कार्यक्र माचा शुभारंभ करण्यात आला. मोहन ओसवाल व शरद पवार यांच्या हस्ते हुतात्मा भाई कोतवाल आणि हुतात्मा हिराजी पाटील यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. अॅड सतीश शेळके, अतुल पवार, मयूर पवार, मयूर वाघमारे, दिनेश पवार, गणेश पवार, नितेश पवार आदींनी सिद्धगडहून आणलेल्या मृतिकेचे पूजन आदर्श शिक्षक मारुती बागडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर शांताराम पवार, नारायण गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली मशाल मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक टिळक चौकात आल्यानंतर साधनशक्तीचे किसन घावट यांनी हुतात्म्यांच्या जीवनावरील पोवाडा सादर केला.
समितीचे अध्यक्ष अॅड. गोपाळ शेळके यांनी आमराईमधील स्मृतीस्तंभाचा परिसर स्वच्छ करण्यात यावा आणि हुतात्मा कोतवाल व्यायामशाळेच्या जागेवरही लक्ष ठेवावे. जुन्या नगरपालिकेची इमारत पाडून तेथे मोठा चौक होईल. त्याच्या बाजूला लो. टिळकांचा पुतळा उभारावा. कर्जतच्या प्रवेशद्वारावर मोठी कमान व भाई कोतवालांचा पुतळा उभारावा, असे सूचित केले. यावेळी जनार्दन परांजपे, महेंद्र चंदन, हृषिकेश जोशी, भारती ढाकवळ, अनिल मोरे, वसंत सुर्वे आदी उपस्थित होते.