विद्यार्थी-पालकांसाठी पनवेलमध्ये आज कार्यक्रम

By Admin | Updated: July 29, 2015 23:50 IST2015-07-29T23:50:18+5:302015-07-29T23:50:18+5:30

सध्याच्या स्पर्धात्मक युगात शालेय विद्यार्थ्यांची जडणघडण, त्यांचे करिअर हे पालकांपुढे मोठे आव्हान ठरत आहे. शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच व्यक्तिमत्त्व विकासही आवश्यक आहे.

Today's program for students and parents in Panvel | विद्यार्थी-पालकांसाठी पनवेलमध्ये आज कार्यक्रम

विद्यार्थी-पालकांसाठी पनवेलमध्ये आज कार्यक्रम

पनवेल : सध्याच्या स्पर्धात्मक युगात शालेय विद्यार्थ्यांची जडणघडण, त्यांचे करिअर हे पालकांपुढे मोठे आव्हान ठरत आहे. शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच व्यक्तिमत्त्व विकासही आवश्यक आहे. मात्र यामुळे विद्यार्थ्यांमधील ताणतणाव वाढत असून त्यांच्यात नैराश्याची भावना निर्माण होते. यावर मात करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी ‘लोकमत’ आणि नगर परिषदेच्या वतीने ‘मुलांच्या समस्या पालकत्वाला आव्हान’ या विनामूल्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पनवेलमधील वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात गुरुवार, ३० जुलैला सकाळी १० वा. हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी चंद्रकांत पागे मार्गदर्शन करणार आहेत.
वरकरणी साध्याच वाटणाऱ्या मुलांमधील या समस्या जाणून त्या मनोरंजनातून, प्रबोधनातून सोडविण्याबरोबरच पालकत्वाला एक नवीन दिशा देण्याचा प्रयत्न या कार्यक्रमात करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला विद्यार्थी, पालकांबरोबरच आजी-आजोबा, शिक्षक, प्राध्यापकांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन नगरपरिषद संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Web Title: Today's program for students and parents in Panvel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.