आज होणार आदर्श शिक्षकांचा गौरव

By Admin | Updated: August 31, 2016 03:24 IST2016-08-31T03:24:57+5:302016-08-31T03:24:57+5:30

पनवेल तालुक्यातील आदर्श शिक्षकांचा गौरव सोहळा मान्यवरांच्या हस्ते बुधवार, ३१ आॅगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात होणार आहे.

Today will be the honor of the ideal teacher | आज होणार आदर्श शिक्षकांचा गौरव

आज होणार आदर्श शिक्षकांचा गौरव

पनवेल : पनवेल तालुक्यातील आदर्श शिक्षकांचा गौरव सोहळा मान्यवरांच्या हस्ते बुधवार, ३१ आॅगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात होणार आहे.
‘लोकमत’ आणि श्री. रामशेठ ठाकूर विकास मंडळाच्या वतीने यंदा प्रथमच शिक्षकांचा सत्कार करण्यात येणार आहे. त्यामुळे या सोहळ्याचे आकर्षण प्रत्येक शिक्षकाला वाटत आहे. ‘लोकमत’ व श्री. रामशेठ ठाकूर विकास मंडळ आयोजित, लोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठान महाराष्ट्र व दीपक फर्टिलायझर व पेट्रोकेमिकल कार्पोरेशन लिमिटेड पुरस्कृत ‘आदर्श शिक्षक पुरस्कार २०१६’प्रदान करण्यात येणार आहेत. पनवेल तालुक्यातील १०० शाळांतून शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. त्यामुळे तालुक्यातील शिक्षकांमध्येही पुरस्काराबद्दल उत्सुकता आहे. कार्यक्रमाला श्री. रामशेठ ठाकूर मित्र मंडळाचे संस्थापक माजी खासदार रामशेठ ठाकूर, विधान परिषदेतील शिक्षक आमदार रामनाथ मोते, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, लोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठान महाराष्ट्रचे अध्यक्ष संजय सोनावणे, दीपक फर्टिलायझर व पेट्रोकेमिकल कार्पोरेशन लिमिटेडचे अध्यक्ष परेश त्रिवेदी व उपाध्यक्ष श्रीपाद लेले, पनवेलच्या नगराध्यक्षा चारुशीला घरत उपस्थित राहणार आहेत. पुरस्कार सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.

Web Title: Today will be the honor of the ideal teacher

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.