बाप्पाला आज भावपूर्ण निरोप
By Admin | Updated: September 27, 2015 00:22 IST2015-09-27T00:22:37+5:302015-09-27T00:22:37+5:30
गणरायाला निरोप देण्यासाठी महापालिका व पोलिस प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. सर्व विसर्जन तलावांवर आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत

बाप्पाला आज भावपूर्ण निरोप
नवी मुुंबई : गणरायाला निरोप देण्यासाठी महापालिका व पोलिस प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. सर्व विसर्जन तलावांवर आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. शहरात कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. वाशीतील शिवाजी चौकामध्ये गणरायांवर पालिकेच्यावतीने पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे.
नवी मुुंबई, पनवेल, उरण परिसरामध्ये दहा दिवसांपासुन उत्साहात गणेश उत्सव साजरा केला जात आहे. पोलिस आयुक्तालय क्षेत्रामध्ये जवळपास १५०० सार्वजनीक व ६५ हजार घरगुती गणेश उत्सवांचे आयोजन केले होते. नवी मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये ४३५ सार्वजणीक गणेश उत्सवाचे आयोजन केले होते. यामधील १७० गणेश मुर्तींना यापुर्वी निरोप देण्यात आला. आनंदचतुर्थीला २६५ गणरायाला निरोप देण्यात येणार आहे. शहरातील २२ विसर्जन तलावांवर महापालिकेने चांगली व्यवस्था केली आहे. तलावांवर गणरायांचे स्वागत केले जाणार आहे. अग्निशमन दलाचे जवान तैनात केले आहेत. वैद्यकिय सुविधाही उपलब्ध करण्यात येणार आहे. पोहणाऱ्या तरूणांचे पथक तलाव परिसरात असणार आहे. याशिवाय बाप्पांना व्यवस्थित तलावामध्ये घेवून जाण्यासाठी स्वयंसेवक तैनात केले आहेत. महापालिका वाशी शिवाजी चौकामध्ये गणरायावर पुष्पवृष्टी करणार आहेत. पोलिसांनीही शहरात जय्यत तयार केली आहे. शिवाजी चौकात विसर्जन मिरवणूक वगळता इतर वाहनांना बंदी करण्यात आली आहे. पोलिसांनी शहरात जवळपास १ हजार पोलिस अधिकारी व कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात केले आहेत. विसर्जन मार्गावर सिसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. साध्या वेशातील पोलिस सर्व ठिकाणी तैनात असणार आहेत. असल्याची माहिती पोलिस उपआयुक्त शहाजी उमाप व सुरेश मेंगडे यांनी दिली. (प्रतिनिधी)