मुंबई-गोवा महामार्गावर तीन वाहनांना विचित्र अपघात

By Admin | Updated: June 3, 2017 06:30 IST2017-06-03T06:30:26+5:302017-06-03T06:30:26+5:30

मुंबई-गोवा महामार्गावर महाड तालुक्यातील टोल फाटा येथे शुक्रवारी सकाळी १०.३०च्या सुमारास तीन कारमध्ये विचित्र अपघात झाला

Three vehicles on the Mumbai-Goa highway have a strange accident | मुंबई-गोवा महामार्गावर तीन वाहनांना विचित्र अपघात

मुंबई-गोवा महामार्गावर तीन वाहनांना विचित्र अपघात

लोकमत न्यूज नेटवर्क
दासगाव : मुंबई-गोवा महामार्गावर महाड तालुक्यातील टोल फाटा येथे शुक्रवारी सकाळी १०.३०च्या सुमारास तीन कारमध्ये विचित्र अपघात झाला. या अपघातामध्ये एस्टीम कारमधील दोन प्रवासी जखमी झाले.
अमेज कार क्र. एमएच ४३ ए.आर. ५५८६ ही शुक्रवारी, मुंबई दिशेने येऊन महाड तालुक्यातील टोळ फाटा या ठिकाणी सकाळी १०.३०च्या सुमारास आल्यानंतर अचानक आंबेत दिशेला वळण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान, महाड ते नाशिक अशी जाणारी एस्टीम कार क्र. एमएच १२ सीआर ८०३० ही अमेज कारवर जोरात आदळली. या धडकेनंतर अमेज या गाडीची दिशा बदलली व याच गाडी मागे असलेली इनोव्हा क्र. एमएच ०६ एबी ७९३४ यावर पुन्हा येऊन धडकली. या विचित्र अपघातामध्ये तिन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर एस्टीम कारमध्ये रत्नागिरीमधील एकाच कुटुंबातील दाम्पत्यासह दोन मुली प्रवास करत होते. संतोष कारेकर (५२) व त्यांची मुलगी हिमानी कारेकर (१९), हे दोन प्रवासी जखमी झाले. दोन्ही जखमींवर महाड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हा अपघात महाड तालुका पोलीस ठाणे हद्दीत झाला. १०.३०च्या अपघातानंतर ३ वाजेपर्यंत महाड तालुका पोलीस ठाण्यात कोणत्याही तऱ्हेचा गुन्हा दाखल झाला
नव्हता.
दोन्ही जखमींवर महाडच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, दुपारी ३ वाजेपर्यंत त्यांचे कोणतेही जबाब घेण्यात आले नव्हते. या जखमींना एका रिक्षावाल्याने उपचारासाठी आणून सोडले होते.

Web Title: Three vehicles on the Mumbai-Goa highway have a strange accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.