तिघांवर अॅट्रॉसिटींतर्गत गुन्हा
By Admin | Updated: November 9, 2014 00:32 IST2014-11-09T00:32:45+5:302014-11-09T00:32:45+5:30
अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी जवखेडे खालसा गावातील दलित हत्याकांडाच्या निषेधार्थ कर्जत तालुक्यातील कडाव बाजारपेठे बंद ठेऊन निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते.

तिघांवर अॅट्रॉसिटींतर्गत गुन्हा
कर्जत : अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी जवखेडे खालसा गावातील दलित हत्याकांडाच्या निषेधार्थ कर्जत तालुक्यातील कडाव बाजारपेठे बंद ठेऊन निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते. परंतु या निषेध सभेपूर्वीच येथील एका तरु णाने सोशल मिडीयावर या दलित हत्याकांडाचे समर्थन करून जातीवाचक व बदनामीकारक शब्दांचा उल्लेख करून सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याने कडाव परिसरातील वातावरण तणावपूर्ण झाले होते. या तरु णाच्या विरोधात कर्जत पोलीस ठाण्यात अॅट्रासिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हत्याकांडाच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात निषेध व आंदोलने करण्यात येत आहेत. पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी ही घटना आहे. कडाव येथील समीर दळवी याने सोशल मिडीयावर या हत्याकांडाचे समर्थन करून जातीवाचक व बदनामकारक विधान केल्याने संतापाची लाट आहे.
कार्यकत्र्यानी कर्जत पोलीस ठाण्याचे उपविभागीय अधिकारी शालिग्राम पाटील यांची भेट घेऊन गुन्हा दाखल करावा असा आग्रह धरला. या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी समीर दळवी, मंगेश दळवी, कल्पेश कोळंबे या तिघांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक केली आहे.