नेरूळमध्ये इमारतीचे तीन स्लॅब कोसळले; ६ जण गंभीर जखमी

By नामदेव मोरे | Updated: August 23, 2023 22:22 IST2023-08-23T22:21:50+5:302023-08-23T22:22:37+5:30

सारसोळे दर्शन दरबार जवळ तुलसी भवन इमारत आहे. सव्वानऊ च्या सुमारास इमारतीच्या तीस-या मजल्याचा स्लॅब अचानक कोसळला.

Three slabs of a building collapsed in Nerul; 6 people seriously injured | नेरूळमध्ये इमारतीचे तीन स्लॅब कोसळले; ६ जण गंभीर जखमी

नेरूळमध्ये इमारतीचे तीन स्लॅब कोसळले; ६ जण गंभीर जखमी

नवी मुंबई: नेरूळ सेक्टर 6 मधील तुलसी भवन इमारतीचे तीन स्लॅब रात्री सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास कोसळले. या दुर्घटनेत आतापर्यंत सहा जण गंभीर जखमी झाले असून त्यांना रूग्णालयात हलविण्यात आले आहे. अग्निशमन दल, मनपा आपत्कालीन विभागाच्या पथकाने ढिगारे उपसत आहेत. घटनास्थळी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती.

सारसोळे दर्शन दरबार जवळ तुलसी भवन इमारत आहे. सव्वानऊ च्या सुमारास इमारतीच्या तीस-या मजल्याचा स्लॅब अचानक कोसळला.या वजनाने सलग तीन मजल्याचे स्लॅब तळमजल्यावरील दुकानापर्यंत खाली कोसळले. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले.अग्निशमन दल, मनपाचे आपत्कालीन विभागाचे पथक ही घटनास्थळी पोहचले. दहा वाजेपर्यंत जवळपास सहा जखमींना बाहेर काढले होते.यामधील काहींची प्रकृती गंभीर आहे. मनपा आपत्कालीन विभागाचे उपायुक्त बाबासाहेब राजळे घटनास्थळी पोहचले आहेत.  

दुर्घटनेच्या ठिकाणी चिंचोळा रस्ता असून नागरिकांनी प्रचंड गर्दी केल्याने मदत कार्यात अडथळे निर्माण होत होते. नक्की किती जखमी झाले व मृत्यू किती जणांचा झाला याविषयी अद्याप प्रशासनाने अधिकृत माहिती दिलेली नाही.

Web Title: Three slabs of a building collapsed in Nerul; 6 people seriously injured