शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
3
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
4
काटली जवळ हिट अँड रन, मॉर्निंग वॉकला गेलेले तीन युवक ठार; मालवाहू ट्रक बनला काळ!
5
घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला!
6
Donald Trump US Tariffs: लेदरपासून ज्वेलरीपर्यंत… डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा कुठे-किती होणार परिणाम? पाहा संपूर्ण यादी
7
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
8
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
9
Raksha Bandhan 2025:रक्षाबंधनाला 'या' पाच गोष्टी औक्षण थाळीत असायलाच पाहिजेत!
10
तिसरा श्रावण शुक्रवार: शुभ-पुण्य मिळेलच, लक्ष्मी देवी वरदान देईल; ‘असे’ करा वरदलक्ष्मी व्रत
11
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
12
बुमराहच्या अनुपस्थितीत भारताने मिळवलेला विजय योगायोगच! हा गोलंदाज ‘असामान्य आणि अविश्वसनीय’ प्रतिभेचा धनी - सचिन तेंडुलकर 
13
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
14
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
15
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
16
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
17
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
18
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
19
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
20
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब

नवी मुंबईत एकाच वेळी तीन सिलिंडरचा स्फोट; आईसह दोन मुलांचा होरपळून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2024 11:51 IST

नवी मुंबईच्या उलवेमध्ये सिलिंडर स्फोटात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला.

Navi Mumbai : ऐन दिवाळीत नवी मुंबई स्फोटाने हादरली आहे. एका दुकानात झालेल्या स्फोटात तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. नवी मुंबईतील उलवे येथील जावळे गावात एका किराणा दुकानात गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन तिघांचा मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे. सिलिंडरचा स्फोट झाल्याने दुकानाला आग लागली. आजूबाजूच्या लोकांनी तातडीने अग्निशमन विभागाला याची माहिती दिली.घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली आणि जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. 

नवी मुंबईतील उलवे येथे बुधवारी सायंकाळी तीन गॅस सिलिंडरच्या स्फोटानंतर एका किराणा दुकानाला आणि घराला लागलेल्या भीषण आगीत एका कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एक महिला आणि दोन मुलांचा समावेश आहे. या घटनेत दुकानदार रमेश जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर त्याची पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू झालाय. नवी मुंबईचे अतिरिक्त पोलिस आयुक्त यांनी या घटनेची माहिती देताना सांगितले की, आम्हाला ३० ऑक्टोबर रोजी रात्री आठ वाजता एका व्यक्तीच्या किराणा दुकानाला आणि घरी आग लागल्याची माहिती मिळाली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किराणा दुकानात तीन गॅस सिलिंडर फुटल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले. त्यामुळे दुकान आणि घराला आग लागली. पाच किलोचे दोन आणि १२ किलोचा एक सिलेंडर फुटला. या घटनेत जखमी रमेशची पत्नी मंजू आणि दोन मुलांचा मृत्यू झाला. तर रमेश जबर जखमी झाला आहे. रमेश हा राजस्थानचा रहिवासी होता. तो कुटुंबासह  नवी मुंबईत राहत होता. जखमींवर अपोलो रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, मुख्य अग्निशमन अधिकारी विजय राणे यांनीही घटनेची माहिती सांगितले की, ​​"आम्ही घटनास्थळी पोहोचून आग विझवली आहे. जखमींना स्थानिक लोकांनी रुग्णालयात दाखल केले आहे. अग्निशमन दलाच्या २ गाड्यांच्या मदतीने आम्ही आग विझवली आहे. गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे ही आग लागल्याचे प्रथमदर्शनी दिसते, मात्र त्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही."

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईAccidentअपघातPoliceपोलिस