महिलेवर अत्याचार करणाऱ्या तिघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2019 00:21 IST2019-09-15T00:21:40+5:302019-09-15T00:21:42+5:30
महिलेवर अत्याचार करून त्याची वाच्यता केल्यास अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याप्रकरणी उरण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

महिलेवर अत्याचार करणाऱ्या तिघांना अटक
उरण : महिलेवर अत्याचार करून त्याची वाच्यता केल्यास अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याप्रकरणी उरण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
करंजा-उरण येथे पीडित महिला राहते. ती घरी एकटी असल्याचा फायदा घेत तिघांनी जबरदस्तीने घरात घुसून तिच्यावर अत्याचार केला. याबाबत वाच्यता केल्यास अश्लिल व्हिडीओ काढल्याचे सांगत तो व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी दिली. या प्रकरणी पीडित महिलेने शुक्रवारी उरण पोलिसांत तक्रार दाखल केली होती. तक्रारीची दाखल घेत उरण पोलिसांनी तीनही आरोपींना तत्काळ अटक केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.