एका भूखंडासाठी तीन वारस दाखले
By Admin | Updated: December 7, 2015 01:24 IST2015-12-07T01:24:29+5:302015-12-07T01:24:29+5:30
नावडे येथे एकाच भूखंडाकरिता एका घरातील दोन व आणखी एक व्यक्ती असे तीन वारस दाखले तयार करण्यात आले आहेत.

एका भूखंडासाठी तीन वारस दाखले
पनवेल : नावडे येथे एकाच भूखंडाकरिता एका घरातील दोन व आणखी एक व्यक्ती असे तीन वारस दाखले तयार करण्यात आले
आहेत. त्यामुळे नेमका वारस कोण याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. खारघर येथील शरद सावंत
यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र
दिले आहे. सत्यता पडताळणीकरिता या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली
आहे.
नावडे येथील सर्व्हे क्र मांक २४६/१६ या वर्णनाची जमीन सिडकोने संपादित केली होती. त्या बदल्यात साडेबारा टक्के योजनेंतर्गत नावडे येथे सेक्टर-५४ येथे ७७ क्र मांकाचा भूखंड मंजूर करण्यात आला आहे. शंकर बाळू म्हात्रे यांचे वारस म्हादू नामा म्हात्रे व बामा नामा म्हात्रे यांना सिडकोने १६00 चौमी भूखंडाची पात्रता असलेले पत्र दिले. त्यानुसार महादू नामा म्हात्रे यांनी सिडको कार्यालयाकडे ९0 हजार रूपये सिडकोला अदा सुध्दा केले. त्यानंतर वारसाबाबत पडताळणी करण्यात आली असता ६७/९८, ८0२/२00८, १५५/९४ हे तीन वारसा दाखल तयार करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.
या तीनही दाखल्यामध्ये नावडे येथील २४६/१६ सर्व्हे क्र माकांचा उल्लेख आहे. रोडपाली येथील
शंकर बगळ्या म्हात्रे यांच्या वारसांनी सुध्दा या भूखंडावर वारसा दाखला तयार करून हक्क सांगितले आहे. त्यांनी वारसा दाखल्यावर रोडपालीतील सर्व्हेबरोबरच नावडे येथील सर्व्हे नंबरचा उल्लेख
करण्यात आला आहे.त्यामुळे एक प्रकारे संभ्रम निर्माण झाला असून नेमका खरा वारस कोण असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. शंकर बाळू म्हात्रे यांच्या वारसांबरोबर हा भूखंड खरेदी करण्याकरिता आपण व्यवहार केला असल्याचे शरद सावंत यांनी सांगितले. मात्र भूखंड क्र मांक ७७चे शंकर बाळू म्हात्रे यांचे दोन वारस दाखल्याबरोबर शंकर बगळ्या म्हात्रे यांचा सुध्दा एक वारस दाखला आपल्या हाती लागला त्यावरून हे प्रकरण उघडकीस आले असल्याचे सावंत म्हणाले.
तफावत दिसून आल्याने पनवेल कोर्टातून देण्यात आलेल्या या दाखल्यापैकी खरा वारस दाखला कोणता व वारसदार कोण हे शोधण्याकरिता सीबीआय चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.