तीन रिक्षाचालकांना लुटणाऱ्या चौघांना अटक

By Admin | Updated: October 5, 2015 00:17 IST2015-10-05T00:17:56+5:302015-10-05T00:17:56+5:30

तीन रिक्षाचालकांना लुटणाऱ्या चौघांना पोलिसांनी अटक केली असून त्यातील तिघेही अल्पवयीन आहेत. वसंत विहार येथील संजय मोहतमल

Three arrested for rickshaw pullers arrested | तीन रिक्षाचालकांना लुटणाऱ्या चौघांना अटक

तीन रिक्षाचालकांना लुटणाऱ्या चौघांना अटक

ठाणे : तीन रिक्षाचालकांना लुटणाऱ्या चौघांना पोलिसांनी अटक केली असून त्यातील तिघेही अल्पवयीन आहेत.
वसंत विहार येथील संजय मोहतमल याच्यासह अन्य तिघांना पोलिसांनी अटक केली. वागळे इस्टेट येथील रिक्षाचालकाच्या रिक्षात दोघे बसले. त्यांनी रिक्षा बीअर कंपनीकडे जाणाऱ्या रोडवर थांबवली. फिर्यादीस ठोसे व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्याच्या खिशातील एक हजार रुपये घेतले. तसेच त्याच्या डोक्याला दुखापत करून रिक्षाची काच फोडून नुकसान केले. याचदरम्यान, त्यांनी इतर दोन रिक्षाचालकांना थांबवून त्यांच्याकडून दोन मोबाइल आणि रोख असा ५७०० रुपयांचा ऐवज दमदाटी करून जबरदस्तीने काढून घेत पोबारा केला. या घटना शुक्रवारी पहाटे घडल्या असून याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक प्र.प्र. कदम तपास करीत आहेत. यामुळे रिक्षाचालकांत दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
(प्रतिनिधी)

Web Title: Three arrested for rickshaw pullers arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.