खारफुटी कत्तलप्रकरणी तिघे अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 05:37 IST2018-12-08T05:37:15+5:302018-12-08T05:37:17+5:30
मातीचा भराव टाकून खारफुटी नष्ट केल्या प्रकरणी उरण वनविभागाने तिघांना अटक केली आहे.

खारफुटी कत्तलप्रकरणी तिघे अटक
उरण : मातीचा भराव टाकून खारफुटी नष्ट केल्या प्रकरणी उरण वनविभागाने तिघांना अटक केली आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी दोन डम्परही जप्त करण्यात आल्याची माहिती उरण वनविभाग अधिकारी शशांक कदम यांनी दिली.
डम्परचालक मोहम्मद सद्दाम हसेन आणि हरिश्चंद्र यादव व सुपरवायझर संतोष निर्मल अशी अटक केलेल्या आरोपींंची नावे आहेत. गुन्ह्यात वापरण्यात आलेले दोन्ही डम्पर जप्त करण्यात आले असून, या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.