साडेतीन हजार मुक्या जिवांना जीवनदान
By Admin | Updated: September 27, 2015 00:20 IST2015-09-27T00:20:40+5:302015-09-27T00:20:40+5:30
वाढत्या शहरीकरणामुळे इमारतींची संख्या वाढत आहेत आणि पशुपक्ष्यांच्या राहण्याची जागा नागरिकांनी घेतल्याने या पक्ष्यांना मात्र आसरा न मिळाल्याने शहराचा इमारतींवर आसरा घ्यावा लागतो

साडेतीन हजार मुक्या जिवांना जीवनदान
प्राची सोनवणे, नवी मुंबई
वाढत्या शहरीकरणामुळे इमारतींची संख्या वाढत आहेत आणि पशुपक्ष्यांच्या राहण्याची जागा नागरिकांनी घेतल्याने या पक्ष्यांना मात्र आसरा न मिळाल्याने शहराचा इमारतींवर आसरा घ्यावा लागतो. वाशी परिसरातील भुमी
जीवदया संवर्धन संस्थेच्या वतीने शहरातील मुक्या जीवांवर मोफत उपचार करुन त्यांना मायेचा आसरा दिला आहे. या वर्षभरात या
संस्थेच्या वतीने साडेतीन हजार मुक्याजीवांचे प्राण वाचविण्यात आले आहे.
नवी मुंबई परिसरातील कुठेही एखादा जखमी पक्षी, प्राणी आढळल्यास या संस्थेचे स्वयंसेवक स्वत: जाऊन त्या मुक्या जीवावर मोफत उपचार करतात, त्याला पुर्णत: बरे होईपर्यंत त्याच्यावर देखरेख ठेवण्यात येते. नवी मुंबई शहरात दिवसेंदिवस पक्ष्यांची संख्या कमी होत असल्याचे दिसून येते असे असताना वाढते प्रदुषण, मानवी वस्तींसाठी होणारी झाडांची कत्तल अशा अनेक कारणांमुळे मुक्या प्राण्याचा बळी जात असल्याच्या घटना वाढत चालल्या आहेत.
या सर्व घटनांचे गांभीर्य ठेवून वाशी परिसरात राहणारा सागर सावला या तरुणाने मुक्या जीवांच्या रक्षणासाठी भुमी जीवदया ही संकल्पना प्रत्यक्षात आणली. राघवजी वाघजी पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली २७ जुलै २०१४ रोजी भुमी जीवदया संवर्धन संस्थेची स्थापना करण्यात आली. या वर्षभराच्या कालावधीत सरपटणारे प्राणी, गाय, बैल, म्हैस तसेच विविध प्रकारच्या पक्ष्यांवर उपचार करुन त्यांचे प्राण वाचविण्यात आले आहे.
वाशीतील लहानश्या खोलीत सुरु केलेल्या या संस्थेचा पुढे विस्तार करावयाचा असून यासाठी या संस्थेला मदतीची अपेक्षा आहे अशी माहिती सागर सावला यांनी दिली. या संस्थेत कार्यरत असलेले धवल देढीया, सचिन धरोड तसेच हित देढीया ही रात्रंदिवस शहरातील मुक्या जीवांच्या उपचाराकरिता मेहनत घेत असतात.