तीन हजार व्यक्तींची शस्त्रे केली जमा
By Admin | Updated: October 14, 2014 00:40 IST2014-10-14T00:40:57+5:302014-10-14T00:40:57+5:30
ठाणो (शहर आणि ग्रामीण) तसेच नवी मुंबई पोलिसांनी सुमारे पाच हजार 266 परवानाधारकांना आपली शस्त्रे जमा करण्याच्या नोटिसा बजावल्या होत्या.

तीन हजार व्यक्तींची शस्त्रे केली जमा
ठाणो : विधानसभा निवडणूक शांततेत पार पडण्यासाठी ठाणो (शहर आणि ग्रामीण) तसेच नवी मुंबई पोलिसांनी सुमारे पाच हजार 266 परवानाधारकांना आपली शस्त्रे जमा करण्याच्या नोटिसा बजावल्या होत्या. यापैकी तीन हजार 6क्5 जणांनी आपली शस्त्रे जमा केली आहेत. त्याचबरोबर 64 बेकायदेशीर शस्त्रे हस्तगत करण्यात आली आहेत.
ठाणो शहर आयुक्तालयाच्या क्षेत्रत तीन हजार 687 व्यक्तींकडे शस्त्रपरवाने आहेत. त्यापैकी दोन हजार 668 परवानाधारकांनी आपली शस्त्रे जमा केली. ठाणो ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यक्षेत्रत 827 जणांकडे शस्त्रपरवाने असून त्यातील 76क् जणांनी शस्त्रे जमा केली. बँक, पेट्रोलपंप, ज्वेलर्स, स्पोर्ट्स आणि ज्यांच्या जीवास धोका आहे, त्या 49 जणांना यातून वगळण्यात आले आहे.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रत 752 शस्त्र परवानाधारक आहेत. त्यापैकी 177 जणांनी त्यांची शस्त्रे जमा केली आहेत. ही शस्त्रे निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर परवानाधारकांना परत दिली जातील. त्याचबरोबर या तिन्ही पोलीस कार्यक्षेत्रंत एकूण 64 बेकायदा शस्त्रे (हत्यारे) जप्त करण्यात आली आहेत. यामध्ये सर्वाधिक ठाणो शहर पोलीस आयुक्तालयातून 53 तर नवी मुंबईतून क्8 आणि ग्रामीण पोलिसांनी क्3 अनधिकृत शस्त्रे जप्त केली आहेत.
निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर बेकायदा शस्त्रे बळगण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले आहे. कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी या कारवाया करण्यात आल्या. (प्रतिनिधी)