शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

तहानलेल्या चाणजे ग्रामपंचायत हद्दीतील हजारो ग्रामस्थ अन् महिलांचा पाणी टंचाई विरोधात तहसीलवर हंडा मोर्चा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2023 17:41 IST

मोर्च्यानंतर शिष्टमंडळाशी केलेल्या चर्चेनंतर विविध समस्या दूर करुन पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी तत्परतेने उपाययोजना करण्याचे ठोस आश्वासन उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिले आहे.

- मधुकर ठाकूर

उरण : राज्य, झेडपी, पंचायत समिती आणि चाणजे ग्रामपंचायतींच्या भोंगळ कारभारावर आसुड ओढत आणि जोरदार घोषणाबाजी करत बुधवारी (१) चाणजे ग्रामपंचायतींच्या हद्दीतील नागरिकांनी पिण्याच्या पाण्यासाठी उरण तहसील कार्यालयावरच अभुतपुर्व हंडामोर्चा काढला होता.या मोर्चात हजारो ग्रामस्थ व महिला सहभागी झाल्या होत्या.

मोर्च्यानंतर शिष्टमंडळाशी केलेल्या चर्चेनंतर विविध समस्या दूर करुन पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी तत्परतेने उपाययोजना करण्याचे ठोस आश्वासन उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिले आहे. त्यानंतरच संतप्त झालेले मोर्चेकरी माघारी परतले आहेत. चाणजे ग्रामपंचायत उरण तालुक्यातील सर्वात मोठी आणि सधन ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते. सुमारे ३५ हजार लोकसंख्या असलेल्या चाणजे ग्रामपंचायतींच्या हद्दीतील सातही पाड्यांना मागील अनेक वर्षांपासून पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.पाणी टंचाई दूर करण्यासाठी मागील काही वर्षांपासून कोट्यावधी रुपये खर्च करून विविध योजना राबविण्यात आल्या आहेत.मात्र या विविध योजनांच्या पुर्ततेनंतरही हजारो ग्रामस्थांच्या नळांना पाण्याऐवजी फक्त हवाच येत आहे.

काही ठिकाणी फक्त २० दिवसातून एकदाच पाणी मिळत आहे.तेही गरजे इतकेही मिळत नसल्याने ऐन उन्हाळ्यातच पाणी टंचाई भीषण झाली आहे.चाणजे ग्रामपंचायतीला १० लाख लिटर पाणी कोटा मंजूर आहे.तरीही एमआयडीसीकडून दररोज ११ लाख लीटर असा ज्यादा पाणी पुरवठा केला जात असल्याचे  एमआयडीसीकडून सांगितले जात आहे. त्या व्यतिरिक्त सिडकोकडून हेटवणे धरणातुनही काही पाड्यांना पाणी पुरवठा केला जात आहे.वापरासाठी बोअरवेल खोदल्या आहेत.इतके पाणी पुरवठा करण्याचे स्त्रोत असताना पाणी जाते कुठे यासाठी ग्रामस्थांनीच शोध घेण्यासाठी पुढाकार घेऊन पाणी टंचाईची कारणे ग्रामस्थांनी शोधून काढली आहेत.या शोध मोहीमेत मागील अनेक वर्षांपासून चाणजे ग्रामपंचायतीच्या आजी-माजी सत्ताधाऱ्यांनीच हद्दीतील सुमारे ६०० इमारतींना अवैध नळ कनेक्शन दिली आहेत.

धनदांडगे थेट मुख्य जलवाहिन्यांनाच विद्युत पंप लाऊन राजरोसपणे मोठ्या प्रमाणावर पाण्याची चोरी करीत आहेत.पाणी पुरवठ्याच्या नियोजनातही ग्रामपंचायत सपशेल अपयशी ठरली आहे.ग्रामपंचायत बिल्डर, धनदांडगे यांच्यातील थेट साटेलोट्यांमुळेच सामान नागरिकांपर्यंत पाणी पोहचत नसल्याचे दिसून आल्यानंतर संतप्त झालेल्या करंजा सातपाड्यांनी ग्रामस्थांनी मागील आठ दिवस जनजागृती करीत पिण्याच्या पाण्यासाठी उरण तहसील कार्यालयावरच मोर्चा काढण्याचा निर्धार पक्का केला होता. त्यानुसार राज्य, झेडपी, पंचायत समिती आणि चाणजे ग्रामपंचायतींच्या भोंगळ कारभारावर आसुड ओढत आणि जोरदार घोषणाबाजी करत बुधवारी (१) चाणजे ग्रामपंचायतींच्या हद्दीतील नागरिकांनी पिण्याच्या पाण्यासाठी उरण तहसील कार्यालयावरच अभुतपुर्व हंडामोर्चा काढला होता.उरण चारफाटा येथुन उरण तहसील कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चात कामगार नेते भूषण पाटील, सातपाड्यांतील गाव अध्यक्ष मनोहर कोळी, संतोष पवार, सिताराम नाखवा आणि हजारोंच्या संख्येने ग्रामस्थ व महिला सहभागी झाल्या होत्या.

महिलांनी तर हंडे वाजवून शासकीय यंत्रणेचा धिक्कार केला.तहसिल कार्यालयावर मोर्चा धडकल्यानंतर अनेक वक्त्यांनी पाणी टंचाईसाठी जबाबदार असलेल्या शासकीय, प्रशासकीय, राज्यकर्त्यांचा शाब्दिक कोट्या करून चांगलाच समाचार घेतला. त्यानंतर मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळाने उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांची भेट घेऊन विस्तृत चर्चा केली.याप्रसंगी उरण एमआयडीसीचे उप अभियंता रविंद्र चौधरी,उरण गटविकास अधिकारी सी.एस.राजपुत, सिडको अधिकारी ॠषी नाईक व शिष्टमंडळातील प्रतिनिधी उपस्थित होते. या चर्चेत शिष्टमंडळाने चाणजे ग्रामपंचायतींचा भोंगळ कारभार उघडकीस आणला.त्यानंतर इमारती, बिल्डर, धनदांडगे व इतरांना दिलेल्या अवैध, अनधिकृत दिलेल्या नळ जोडण्या तोडण्याचे तसेच बेकायदेशीर सुरू असलेली पाणी चोरी रोखण्यासाठी विद्युत पंप जप्त करण्याची कारवाई करण्याच्या सूचना तहसीलदारांनी चाणजे ग्रामपंचायतींला दिल्या आहेत.

चाणजे ग्रामपंचायत हद्दीतील गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. तर जल जीवन मिशन योजने अंतर्गत १० कोटी खर्चाच्या योजनेचे काम सुरू करण्यात आले असल्याची माहिती उरण गटविकास अधिकारी सी.एस.राजपुत यांनी दिली.सिडको अधिकाऱ्यांनीही हेटवणे धरणातुन करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्यात आणखी वाढ करण्याचे आश्वासन दिले आहे.शासकिय अधिकाऱ्यांनी दिलेल्या ठोस आश्वासनानंतरच मोर्चेकऱ्यांनी तुर्तास माघार घेतली असल्याचे भूषण पाटील, मनोहर कोळी यांनी सांगितले.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई