कोळवेतील तलावात रसायनामुळे हजारो मासे मृत
By Admin | Updated: November 26, 2014 22:44 IST2014-11-26T22:44:51+5:302014-11-26T22:44:51+5:30
पेण तालुक्यातील वडखळ येथील कोळवे तलावात विषारी रसायन टाकण्यात आल्याने हजारो मासे मृत पडल्याची घटना घडली.

कोळवेतील तलावात रसायनामुळे हजारो मासे मृत
वडखळ : पेण तालुक्यातील वडखळ येथील कोळवे तलावात विषारी रसायन टाकण्यात आल्याने हजारो मासे मृत पडल्याची घटना घडली. कुणीतरी जाणूनबुजून तलावात हे रसायन टाकले असण्याची शक्यता नागरिकांकडून वर्तवण्यात येत आहे.
वडखळ ग्रामपंचायतीतील कोळवे तलाव कमलाकर पाटील गेल्या काही वर्षापासून लिलावाने घेत आहेत. तलावात मच्छी व्यवसाय करून ते आपल्या कुटुंबाची गुजराण करतात. अनेक अडचणींवर मात करीत ते हा व्यवसाय करीत होते परंतु काही अज्ञात व्यक्तींनी तलावात विषारी द्रव्य टाकल्याने तलावातील हजारो मासे मृत्युमुखी पडले आहेत. त्यामुळे पाटील यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्या बरोबर तलावातील पाणीही दूषित झाले आहे.
या घटनेची चौकशी करण्याची तसेच पंचनामे करु न नुकसान भरपाई मिळण्याची मागणी ग्रामपंचायत वडखळ, गटविकास अधिकारी पेण, पेण तहसीलदार, वडखळ पोलीस ठाणो,आरोग्य विभाग, मत्स्य विभाग व इतर संबंधिताकडे केली आहे. (वार्ताहर)