शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
2
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
3
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
4
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
5
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
6
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
7
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
8
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
9
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
10
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
11
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
12
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
13
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
14
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
15
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
16
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
17
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
18
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
19
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
20
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!

एक हजार क्विंटल द्राक्षांची आवक , एपीएमसीत "५० ते ६० : किरकोळ बाजारात " ७० ते ११० किलो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 2:40 AM

या महिन्याच्या सुरुवातीला द्राक्षांची आवक कमी होती. मात्र, आता आवक वाढल्याने दरही आवाक्यात आहेत. सर्वसामान्यांना आता द्राक्षांची चव चाखता येणार आहे.

प्राची सोनवणे नवी मुंबई : गेल्या आठवडाभरापासून बाजारात द्राक्षांची मागणी वाढली आहे. राज्यभरातून वाशीतील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील फळबाजारात आठ ते दहा गाड्या द्राक्षांची आवक होत आहे. या महिन्याच्या सुरुवातीला द्राक्षांची आवक कमी होती. मात्र, आता आवक वाढल्याने दरही आवाक्यात आहेत. सर्वसामान्यांना आता द्राक्षांची चव चाखता येणार आहे.एपीएमसी मार्केटमध्ये १००० क्विंटल द्राक्षांची आवक झाली आहे. काळ््या द्राक्षांचे दर सफेद द्राक्षांच्या तुलनेने जास्त असून, घाऊक बाजारात काळे द्राक्ष ५० ते ६० रुपये किलो दराने उपलब्ध आहे. दररोज द्राक्षांच्या आठ ते दहा गाड्या बाजारात दाखल होत आहेत. दहा किलोच्या पेट्यांची मोठ्या प्रमाणात आवक होत असल्याची माहिती व्यापाºयांनी दिली.द्राक्षांचे दर आवाक्यात असल्याने ग्राहकांची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. नाशिक द्राक्षे प्रसिद्ध असल्याने त्यांची बाजारात मागणीही जास्त आहे. मात्र, आता नाशिकबरोबर फलटण, बारामती, तासगाव, सांगलीवरूनही द्राक्षांची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. किरकोळ बाजारपेठेत ७० ते ११० रुपये किलो दराने काळ्या द्राक्षांची विक्री केली जात आहे, तर ६० ते १०० रुपये किलो दराने सफेद द्राक्षांची विक्री केली जात आहे. आकाराने लांब असणाºया सोनाक्का जातीच्या द्राक्षांची दहा किलोची पेटी ६०० ते ७५० रु पये दराने विकली जात आहे, तर काळ््या द्राक्षांची १० किलोची पेटी ६५० ते ९०० रुपये दराने विकली जात आहे. सिडलेस म्हणजे बी नसलेल्या द्राक्षांची दहा किलोची पेटी ५०० ते १ हजार रु पयांस मिळत आहे. नोव्हेंबर ते एप्रिल हा द्राक्षांचा हंगाम असून, पुढील फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात द्राक्षांची आवक आणखी वाढणार असून दर कमी होण्याची शक्यता व्यापाºयांनी वर्तविली आहे.पनेटमध्ये विक्र ीस्ट्रॉबेरीची विक्र ी प्लास्टिकच्या पनेटमध्ये (छोटे प्लास्टिकचे खोके) केली जाते. आता मात्र ग्राहकांचे लक्ष वेधण्यासाठी द्राक्षांचीही पनेटमध्ये विक्र ी करण्यास सुरु वात करण्यात आली आहे. पनेटमध्ये अर्धा ते एक किलो द्राक्षे बसतात. चांगल्या दर्जाची, चवीला गोड असणाºया द्राक्षांची पनेटमधून विक्र ी केली जात आहे. पनेटमधील द्राक्षे ग्राहकांच्या पसंतीस उतरली आहेत, अशी प्र्रतिक्रिया व्यापाºयांनी व्यक्त केली.वातावरणातील बदलामुळे सध्या बाजारात येणाºया द्राक्षाला हवा तितका गोडवा नसून, आवकच्या तुलनेत ग्राहकांची मागणी मात्र कमी आहे. फेब्रुवारीत द्राक्षाचा गोडवा आणखी वाढून उष्णतेबरोबरच मागणी देखील वाढणार असल्याची माहिती फळ व्यापारी संजय पिंपळे यांनी सांगितले. सांगलीतील तासगाव येथून द्राक्षांची मोठ्या प्रमाणात आवक होत असल्याचेही पिंपळे यांनी सांगितले.